Milk Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Milk Rate : ‘वारणा’ची गाय दूध खरेदीदरात ३ रुपये वाढ

वारणा दूध संघाने गाईच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटर ३ रुपये, तर म्हशीच्या दुधास प्रतिलिटर २ रुपये दरवाढ देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली.

टीम ॲग्रोवन

वारणानगर, जि. कोल्हापूर : वारणा दूध संघाने (Warana Milk) गाईच्या दूध खरेदीदरात (Cow Mik Purchase) प्रतिलिटर ३ रुपये, तर म्हशीच्या दुधास प्रतिलिटर २ रुपये दरवाढ देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore) व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली. ही दरवाढ शुक्रवारपासून (ता. २१) लागू होणार आहे.

डॉ. कोरे म्हणाले, की शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, आता गाय दूधासाठी ३.५ फॅटला व ८.५ एस.एन.एफ.ला ३५ रुपये दर झाला आहे. म्हैस दुधासाठी ६.० फॅट व ९.० एसएनएफला ४७.५० पैसे इतका उच्चांकी दर मिळणार आहे.

वेळोवेळी शेतकऱ्यांचा विचार करून संघाने वर्षभरात गाय दुधास ९ रुपये, तर म्हशीच्या दुधास ८ रुपये दरवाढ दिली आहे. सध्या संघाकडील दूध व दूध पावडरला वाढीव मागणी प्राप्त झाली आहे. संघाची दही, लस्सी, ताक, श्रीखंड, आम्रखंड या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

संघाने लम्पी स्कीन आजारावर लसीकरण मोहीम सुरू करून दीड लाखांवर मोफत लस जनावरांना दिली, तसेच अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून ३० लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे.

अल्पदरात पशू वैद्यकीय सेवा व रेडी संगोपन या सारखे उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, अकाउंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील, मार्केटिंग इनचार्ज अनिल हेर्ले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT