Milk Rate : जागतिक दूग्ध व्यवसाची उलाढाल सर्वाधिक

टीम ॲग्रोवन

पुणे : जगात जो दुग्धव्यवसाय  केला जातो तो कदाचित मानवजातीच्या सभ्यतेइतकाच जुना असल्याचं मत जागतिक तज्ञांनी व्यक्त केलंय. 

Milk Products | Agrowon

तसेच आज अॅपल किंवा मग मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांची जेवढी उलाढाल आहे, त्याहीपेक्षा जास्त उलाढाल दुग्ध व्यवसायात होत असल्याचं या तज्ञांनी म्हटलंय.

Companies | Agrowon

ग्रेटर नोएडा मध्ये वर्ल्ड डेअरी समिट २०२२ पार पडली. या समिटसाठी जगभरातून दुग्ध व्यवसायातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

World Dairy Summmit | Agrowon

आयएफसीएन एजी जर्मनीचे सीईओ डॉ. टॉरस्टेन हेम यावेळी म्हणाले की, डेअरी उद्योगाचे ग्राहक मूल्य ८०० अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. 

Milk | Agrowon

दुग्ध व्यवसायातील ही उलाढाल अॅपल किंवा मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या एकत्रित कमाईपेक्षाही मोठी आहे.

Milk Processing Unit | Agrowon

डाॅ. हेम आपल्या सादरीकरणात पुढे म्हणाले की, २०१४ ते २०१९ या कालावधीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण कमाईत 70% पेक्षा जास्त वाटा हा दुधातून मिळणाऱ्या कमाईचा होता. 

Milk Unit | Agrowon

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष मीनेश शाह यांच्या मते, विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमध्ये दुग्धव्यवसाय खूप महत्त्वाचा आहे.

Milk Unit | Agrowon

भारताच्या दुग्ध व्यवसायासंबंधात शाह यापूर्वी म्हटले होते की, सध्या भारताचा दुग्धव्यवसाय 13 ट्रिलियन इतका आहे. 2027 पर्यंत यात वाढ होऊन तो 30 ट्रिलियन इतका होईल. 

Milk | Agrowon

यावेळी पद्दुचेरी येथील तज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉ. एस. राजकुमार यांनी दुग्धव्यवसायातील महिलांचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले की, "गाई आणि म्हशींपासून दूध उत्पादकता वाढवण्यात महिलांचा सहभाग ही काळाची गरज आहे."

Milk | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon
येथे क्लिक करा