Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market News : हिंगोलीत हळदीला मिळाला ५८९८ ते १४५८८ रुपये दर

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये चालू आर्थिक वर्षामधील (२०२३-२४) पहिल्या सहामाहीत (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर) हळदीची एकूण १ लाख ७७ हजार ४६१ क्विंटल आवक झाली.

प्रतिक्विंटल किमान ५८९८ ते कमाल १४५८८ रुपये दर मिळाले. गतवर्षी (२०२२) एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ९९ हजार ६०३ क्विटंल आवक झाली होती. त्यातुलनेत यंदा ७७ हजार ८५८ क्विटंल आवक जास्त झाली.

हिंगोली बाजार समितीच्या संत नामेदव हळद मार्केटमध्ये हिंगोली जिल्हा तसेच शेजारील नांदेड, परभणी हे जिल्हे तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, बुलडाणा आदी जिल्ह्यांतून हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. जाहीर लिलाद्वारे खरेदी केली जाते. यंदाच्या एप्रिलपासून हळदीची आवक वाढली आहे.

मेपासून शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लिलाव व मोजमापाची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस हळदीची आवक होत आहे.

यंदाच्या १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या ६ महिन्यांच्या कालावधीत हळदीची एकूण १ लाख ७७ हजार ४६१ क्विंटल आवक झाली. हळदीला यंदा एप्रिलमध्ये सर्वांत कमी प्रतिक्विटंल सरासरी ५८९८ रुपये दर मिळाला तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक प्रतिक्विंटल सरासरी १४५८८ रुपये दर मिळाला.

गतवर्षी (२०२२-२३) मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत हळदीची ९९ हजार ६०३ क्विंटल आवक झाली होती. त्यात एप्रिलमध्ये १६०५९ क्विंटल, मेमध्ये २०६३०, जूनमध्ये १६९४५, जुलैमध्ये २१८३०, ऑगस्टमध्ये ९६८५, सप्टेंबरमध्ये १४४५४ क्विंटल आवक झाली होती. त्या वेळी एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रतिक्विंटल सरासरी ७२९० रुपये तर सप्टेंबरमध्ये सर्वांत कमी प्रतिक्विंटल सरासरी ६३१७ रुपये दर मिळाले होते.

संत नामदेव हळद मार्केट एप्रिल ते सप्टेंबर २०२३ हळद आवक व भाव स्थिती

महिना...आवक (क्विंटल)...सरासरी भाव (रुपयांत)

एप्रिल...२३३२०...५८९८

मे...३७१५०...६३३४

जून...२६८२५...७०७२

जुलै...४५१९२...१०५९४

ऑगस्ट...३१०८१...१४५८८

सप्टेंबर...१३८९३...१२५८९

गतवर्षी वर्षभर हळदीचे दर दहा हजारांच्या आत होते. यंदा जूनअखेरपासून दरात तेजी आली. त्यामुळे हळदीच्या आवकेत विक्रमी वाढ झाली आहे.
- नारायण पाटील, सचिव, बाजार समिती, हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT