Turmeric Export : हळदीच्या उत्पादनासह निर्यातीला मिळणार चालना

Turmeric News : या करारांतर्गत हळदीची संपूर्ण मूल्यशृंखला विकसित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यात गुणवत्ता, प्रतवारी, पीक उत्पादन वाढविण्याच्या पद्धती, किमतीतील चढ-उतार टाळणे आणि वित्त व्यवस्था याविषयी माहिती समाविष्ट असेल.
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज (एनसीडीएक्स) यांच्यात हळद उत्पादन आणि निर्यातीस चालना देण्यासाठी बुधवारी (ता. २७) मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई येथे पार पडलेल्या पहिल्या जागतिक हळद परिषदे दरम्यान हा करार करण्यात आला. या वेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, ‘एनसीडीएक्स’चे व्यवस्थापकीय संचालक अरुण रास्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Turmeric
Turmeric : हळद, संत्रा पिकांच्या उत्पादकतेत वाढ निर्माण करावी

या करारांतर्गत हळदीची संपूर्ण मूल्यशृंखला विकसित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यात गुणवत्ता, प्रतवारी, पीक उत्पादन वाढविण्याच्या पद्धती, किमतीतील चढ-उतार टाळणे आणि वित्त व्यवस्था याविषयी माहिती समाविष्ट असेल.

Turmeric
National Turmeric Board : पंतप्रधानांकडून राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेची घोषणा ; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

हळद संशोधन केंद्राला राज्यातील हळदीचा व्यापार आणखी सुधारण्यासाठी आणि ती देशभरात नेण्यासाठी ‘एनसीडीएक्स’कडून पूर्ण सहकार्य मिळेल. खासदार पाटील म्हणाले, ‘‘हळद आता राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रमुख पीक बनले आहे. लवकरच उभारण्यात येणारे संशोधन केंद्र ही प्रक्रिया पुढील स्तरावर नेणार आहे.’’

रास्ते म्हणाले, ‘‘शेअर बाजारातील भागधारकांना सहभागी होण्यासाठी एक समान व्यासपीठ प्रदान करून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पहिली जागतिक हळद परिषद घेण्यात येत आहे. या परिषदेत हळद क्षेत्राच्या विविध मापदंडांवर चर्चा करण्यात आली.

त्यात सर्वोत्तम उत्पादन पद्धती, विपणन, गुणवत्ता, किंमत वाढ, स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आदी पीक उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या हवामान परिस्थितीवरही परिषदेत चर्चा करण्यात आली.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com