National Turmeric Board : राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापनेची घोषणा

Turmeric Market : देशातील हळद उत्पादन, उत्पादनांचा विकास, वाढ आणि निर्यातीच्या हेतूने ‘राष्ट्रीय हळद मंडळा’ची स्थापना करण्यात येणार आहे.
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : देशातील हळद उत्पादन, उत्पादनांचा विकास, वाढ आणि निर्यातीच्या हेतूने ‘राष्ट्रीय हळद मंडळा’ची स्थापना करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत अधिसूचित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

‘राष्ट्रीय हळद मंडळ हे हळद-संबंधित बाबींचे नेतृत्व करेल, याकरिताच्या प्रयत्नांना चालना देईल आणि हळद क्षेत्राच्या विकास आणि वाढीसाठी ‘मसाले मंडळ’ आणि इतर सरकारी संस्थांसोबत अधिक समन्वय साधेल.’ असे सरकारने म्हटले आहे.

मानवी आरोग्यासाठी हळदीचे मोठे महत्त्व आहे, हळदीत आरोग्यदायी क्षमता असून, तिच्या वापराबाबत जगभरात स्वारस्य आहे.

Turmeric
Turmeric Export : हळदीच्या उत्पादनासह निर्यातीला मिळणार चालना

हळदीची जागरूकता आणि उत्पादनांची विक्री, निर्यात वाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करणे, नवीन मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे आणि भारताचे पारंपारिक ज्ञान विकसित करण्याकरिता मंडळ महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

‘याशिवाय मंडळ विशेषत: मूल्यवर्धनातून अधिक फायदे मिळविण्यासाठी हळद उत्पादकांच्या क्षमता वाढीवर आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करेल. गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा मानकांना प्रोत्साहन देईल आणि अशा मानकांचे पालन करेल. मानवतेसाठी मंडळ हळदीच्या पूर्ण क्षमतेचे संरक्षण आणि उपयुक्ततेसाठी पावले उचलेल,’ असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मंडळाचे उपक्रम हळद उत्पादकांच्या समृद्धीसाठी हातभार लावतील. शेतकऱ्यांच्या अधिक उत्पन्नाकरिता शेतांच्या जवळ मोठ्या प्रमाणात उत्पादनांचे मूल्यवर्धन केले जाईल. आपले उत्पादक आणि प्रक्रियादार उच्च दर्जाची हळद आणि उत्पादनांचे निर्यातदार व्हावे, तसेच जागतिक बाजारपेठेत त्यांचे अग्रगण्य स्थान कायम राखण्याकरिता मंडळ आपल्या उपक्रमांत संशोधन, बाजार विकास, वाढता वापर आणि मूल्यवर्धन याकडे सातत्याने लक्ष ठेवणार आहे.

Turmeric
Turmeric Farming : सरकार स्थापन करणार राष्ट्रीय हळद बोर्ड, उत्पादक शेतकऱ्यांना फायदा काय?

असे असेल मंडळाचे ‘मंडळ’

- अध्यक्ष : केंद्र सरकार नियुक्त

- सचिव : वाणिज्य विभागाद्वारे नियुक्त

- प्रतिनिधी : औषधनिर्माण विभाग, आयुष मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, तीन राज्यांतील वरिष्ठ राज्य सरकारचे प्रतिनिधी (रोटेशन आधारावर), राष्ट्रीय/राज्य संशोधन संस्था प्रतिनिधी. हळद उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, निर्यातदार प्रतिनिधी

हळद उत्पादन (२०२२-२३)

जगातील सर्वाधिक उत्पादन : भारत

लागवड क्षेत्र (भारत) : ३.२४ लाख हेक्टर

उत्पादन : ११.६१ लाख टन (जागतिक उत्पादनाच्या ७५ टक्के)भारतातील हळदीच्या जाती : ३०

हळद उत्पादक राज्ये : २०

हळद उत्पादक प्रमुख राज्ये : महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू

हळद निर्यात (२०२२-२३)

एकूण जागतिक व्यापारात भारताचा वाटा : ६२ टक्के

भारतातून निर्यात : १.५३४ लाख टन

एकूण निर्यात मूल्य : २०७.४५ दशलक्ष डॉलर्स

देशातील प्रमुख निर्यातदार : ३८०

भारतीय हळदीचे प्रमुख आयातदार देश : बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि मलेशिया.

२०३० पर्यंत हळद निर्यातीचे भारतीय लक्ष : १ अब्ज डॉलर्स

‘‘सध्या आपण १६०० कोटी रुपयांनी हळद निर्यात करत आहोत. यापुढील निर्यात लक्ष्य हे ८४०० कोटी रुपयांचे असेल, हे लक्ष्य गाठण्याकरिता राष्ट्रीय हळद मंडळाची आवश्‍यकता आहे.’’
- अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com