Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Rate: हळदीचा भाव तेलंगणा, आंध्र प्रदेशात १० हजारांच्या खाली पोचला

Turmeric Market : देशातील बाजारात नव्या हळदीची आवक वाढत आहे. त्यामुळे दरावर दबावही वाढत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचा भाव ७ हजार ते १० हजारांच्या दरम्यान पोचला.

अनिल जाधव

Pune News : देशातील बाजारात नव्या हळदीची आवक वाढत आहे. त्यामुळे दरावर दबावही वाढत आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचा भाव ७ हजार ते १० हजारांच्या दरम्यान पोचला. तर महाराष्ट्र आणि तमिळनाडूत भाव १० हजार ते १३ हजारांच्या दरम्यान दिसत आहे. पुढच्या काळात हळदीची आवक आणि वाढणार आहे. त्यामुळे हळदीच्या दरावरही दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

भारत हळद उत्पादनात आणि निर्यातीत आघाडीवर आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ८० टक्के उत्पादन भारतात होते. त्यानंतर चीन ८ टक्के, म्यानमार ४ टक्के, नायजेरिया ३ टक्के आणि बांगलादेश ३ टक्के हळदीचे उत्पादन घेतो.

केंद्र सरकारच्या पहिल्या सुधारित अंदाजानुसार देशात यंदा ११ लाख १६ हजार टन उत्पादन होऊ शकते.यापैकी महाराष्ट्रात २ लाख ९० हजार टन, कर्नाटकात १ लाख ७ हजार टन, तमिळनाडू १ लाख ४४ हजार टन आणि तेलंगणात १ लाख ३३ हजार टन उत्पादनाचा अंदाज आहे.

देशातील बाजारात आता हळदीची आवक वाढत आहे. तेलंगणातील आवक काहीशी अधिक दिसत आहे. त्याचा दबाव दरावर आला आहे. तेलंगणात हळदीचा भाव १० हजारांच्याही खाली आला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात हळदीचे भाव दबावात आले आहेत.

बाजारातील वाढत्या आवकेचा दबाव दरावर दिसून येत आहे. वाढत्या आवकेबरोबर दरावर दबाव दिसत आहे. २०२४ मध्ये हळदीचा भाव २० हजारांपर्यंत पोचला होता. मात्र सध्या हळदीच्या भावात नरमाई दिसून आली. भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

तेलंगणा हळद उत्पादनात महत्वाचे राज्य आहे. तेलंगणात जवळपास ४२ हजार एकरवर लागवड होते. तर यंदा १ लाख ३३ हजार टन हळद उत्पादनाचा अंदाज आहे. तेलंगणामध्ये सध्या हळदीची आवक चांगली आहे. त्यामुळे बाजारात दर ७ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. आंध्र प्रदेशातही याच दरम्यान भाव मिळत आहे.

तमिळनाडू राज्यात हळदीचे भाव काहीसे टिकून आहेत. तमिळनाडूतही हळदीचे भाव कमी झाले आहेत. मागील महिन्यात १५ हजारांच्या दरम्यान असलेले भाव आता २ ते ४ हजारांपर्यंत कमी झाले. हळदीला आता सरासरी ११ हजार ते १३ हजारांपर्यंत हळदीला भाव मिळत आहे.

महाराष्ट्रातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढत असून दरावर काहीसा दबाव दिसत आहे. सध्या सांगली, वाई, वसमत, वाशीमसह महत्वाच्या बाजारांमध्ये हळदीची आवक वाढत आहे. बाजारातील वाढलेल्या आवकेचा दबाव दरावर आला आहे.

हळदीचा भाव महिनाभरातच २ ते ३ हजारांनी कमी झाला. सध्या बाजारात सरासरी प्रतिक्विंटल १० हजार ते १३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव येऊ शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

Mango Orchards: बागेत पाणी साचल्याने झाडांच्या मुळांची होते दमकोंडी

SCROLL FOR NEXT