Turmeric Production : देशात हळदीचे उत्पादन ८० हजार टनांनी घटण्याची शक्यता

Turmeric Disease : गत वर्षी ऑक्टोबरअखेर पावसाचा फटका हळद पिकाला बसल्याने सुमारे १५ ते २० कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला.
Turmeric Market
Turmeric Agrowon
Published on
Updated on

Sangli News : गत वर्षी ऑक्टोबरअखेर पावसाचा फटका हळद पिकाला बसल्याने सुमारे १५ ते २० कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, देशातील हळदीच्या उत्पादनात ८ टक्के म्हणजे ८० हजार टनांनी घटेल असा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. आजमितीस ८५ टक्के क्षेत्रावरील हळदीची काढणी आटोपली असून, मार्चअखेरीस काढणी पूर्ण होईल.

गत वर्षी वाढते तापमान आणि यंदा सतत पडलेल्या पावसामुळे हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळदीची लागवड लांबली होती. परिणामी, हळदीच्या क्षेत्रात ३५ हजार हेक्टरने कमी झाली आहे. देशात २ लाख ७० हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे.

Turmeric Market
Turmeric Processing: हळदीवरील सुधारित प्रक्रिया: दर्जेदार उत्पादनाची गुरुकिल्ली!

जानेवारीपासून हळद काढणीला सुरुवात झाली असून देशभरात ८५ टक्के क्षेत्रावरील हळदीची काढणी पूर्ण झाली आहे. देशातील प्रमुख हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात महाराष्ट्र ८५ टक्के, कर्नाटक १०० टक्के, तेलंगणा १०० टक्के आंध्र प्रदेश ७० टक्के, तर तमिळनाडू ७० टक्के हळदीची काढणी झाली आहे.

गत वर्षी जून महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही अंशी लागवड पुढे गेली. त्यात वाढलेल्या तापमानाचा फटकाही लागवडीला बसला. त्यातून शेतकऱ्यांनी नियोजन करत पीक साधले. मात्र हळद पीक आणि कंद वाढीच्या काळात परतीचा पाऊस आणि मॉन्सूनोत्तार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले.

Turmeric Market
Turmeric Conference : रिसोड बाजार समितीत हळद परिषद; चिया खरेदीला सुरुवात

यामुळे हळदीवर करपा आणि कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला. हळदीवर सुमारे १५ ते २० टक्के कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळदीच्या उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होईल, असा अंदाजही व्यक्त केला होता. परंतु शेतकऱ्यांना कंदकुज रोग नियंत्रण आणण्यासाठी कृषी विद्यापाठीच्या शिफारशीप्रमाणे उपाययोजना केल्या. त्यामुळे उत्पादनात फारशी घट होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

देशात सन २०२३-२४ मध्ये तीन लाख ५ हजार १८२ हेक्टरवर हळदीची लागवड होती. सुमारे ११ लाख ८० हजार टन हळदीचे उत्पादन झाले होते. यंदा २ लाख ७० हजार हेक्टरवर हळदीचे पीक होते. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे हळदीचे उत्पादन ११ लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. हळदीची पूर्ण काढणी झाल्यानंतर देशात हळदीचे उत्पादन किती होईल याची आकडेवारी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समोर येईल.

हळदीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. पावसामुळे हळदीला कंदकुज रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळदीचे उत्पादन घटणार आहे.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबेडिग्रज, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com