Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Farming : हळदीचे क्षेत्र १० हजार हेक्टरने घटण्याची शक्यता

Turmeric Cultivation : गतवर्षी कमी पर्जन्यमान, वाढती उष्णता आणि लांबलेला पाऊस या साऱ्याचा फटका हळद लागवडीवर झाला.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गतवर्षी कमी पर्जन्यमान, वाढती उष्णता आणि लांबलेला पाऊस या साऱ्याचा फटका हळद लागवडीवर झाला. यामुळे यंदा हळदीच्या लागवडीसाठी शेतकरी धजावले नाहीत. परिणामी, यंदा ७८ हजार ३०० हेक्टरवर लागवड झाली असून, १० हजार ९७३ हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट होण्याचा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

राज्यातील प्रामुख्याने हिंगोली, वाशीम, नांदेड, जळगाव, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत हळदीचे क्षेत्र सर्वाधिक असते. तर परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतही कमी अधिक हळद लागवड होते. गेल्या तीन वर्षांत राज्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी हळदीची ८९ हजार २७३ हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र गतवर्षी पीकवाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनात घट झाली होती. यामुळे बाजारात हळदीच्या दर वाढले होते.

गतवर्षी हळदीला चांगले दर मिळाल्याने यंदाच्या हंगामात हळद लागवडीसाठी शेतकरी पुढे येतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यातच उष्णताही वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरम्यान, हळद लागवडीसाठी पुढे आले नाहीत. परंतु ज्या भागात हळद लागवडीसाठी पुरेसे पाणी होते, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी हळद लागवड केली.

हळद लागवड मे आणि जून महिन्यांत प्रामुख्याने केली जाते. लागवडीसाठी पोषक वातावरण नव्हते. वाढती उष्णता आणि वेळेत पाऊस सुरू झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवड एक महिना लांबणीवर गेली. या साऱ्याचा फटका हळद लागवडीला बसला आहे.

बियाणे दराचा लागवडीवर परिणाम

राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बहुतांश घरचेच बियाणे हळद लागवडीसाठी वापरतात. परंतु अनेक शेतकरी नवीन बियाणे खरेदी करून हळदीची लागवड करतात. वास्तविक पाहता, हळदीचे बियाणचे दर सरासरी ३००० रुपये प्रति क्विंटल असे असतात. परंतु गतवर्षी पाण्याची टंचाई आणि कमी पाऊस यामुळे हळदीच्या उत्पादनात घट झाली. परिणामी, बियाणे उत्पादनही घटले. त्यामुळे यंदा हळदीच्या बियाणे दर सात हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. अर्थात, गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रति क्विंटलला ४ हजार रुपयांनी दर वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे घेण्याकडे पाठ फिरवली असल्याचे हळद बियाणे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी, हळद बियाण्याच्या वाढत्या दराचा फटका लागवडीवरही झाला असल्याचे चित्र आहे.

राज्यातील वर्षनिहाय हळद

लागवड दृष्टिक्षेप (क्षेत्र हेक्टरमध्ये)

वर्ष क्षेत्र

२०१९-२०२० ५४,२४८

२०२०-२१ ५९,५७६

२०२१-२२ १,०२,६६९

२०२२-२३ ८८,३१८

२०२३-२४ ८९,२७३

२०२४-२५ ७८,३०० (अंदाजे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT