Tur rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market Rate : खानदेशात तुरीला ७५०० रुपयांपर्यंत दर

खानदेशात तूर आवक बाजारात घटली आहे. सध्या कमाल दर ७५०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. कमी लागवड व चांगली मागणी यामुळे दर टिकून आहेत.

Team Agrowon

Tur Market Update जळगाव ः खानदेशात तूर आवक (Tur Arrival) बाजारात घटली आहे. सध्या कमाल दर (Tur Rate) ७५०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. कमी लागवड (Tur Cultivation) व चांगली मागणी यामुळे दर टिकून आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर व पाचोरा येथील बाजारात तुरीची आवक होते. धुळ्यात दोंडाईचा (ता. शिंदखेडा) आणि नंदुरबारात नंदुरबार बाजार समितीत तुरीची आवक होते. परंतु या सर्वच बाजारांत यंदा आवक कमी राहिली आहे.

मागील १० ते १२ दिवसांत आवक आणखी घटली आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत मिळून मागील १० दिवसांत प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल तुरीची आवक झाली. काही दिवस आवक झाली, तर काही दिवस आवकच झाली नाही, अशीही नोंद आहे.

जळगाव, चोपडा, यावल, जामनेर येथील बाजारांत तुरीची आवकच मागील आठ ते १० दिवसांत झालेली नसल्याची माहिती आहे. धुळ्यातील दोंडाईचा येथील बाजारातही आठवड्यातून दोन-तीन वेळेस तुरीची आवक झाली आहे.

तीदेखील प्रतिदिन सरासरी ५० क्विंटलच राहिली आहे. नंदुरबार येथील बाजारातही मागील पंधरवड्यात तुरीची आवक नगण्य किंवा अल्पच राहिली.

देशी तुरीला आठ हजारांपर्यंत दर

देशी तुरीला चांगली मागणी आहे. अनेक खरेदीदार, किरकोळ विक्रेते थेट शेतकऱ्यांकडून शिवार खरेदी किंवा खेडा खरेदीत तूर घेत आहेत. प्रति क्विंटल ७५०० रुपये दर आहे. गडद तपकीरी रंगाच्या व लहान आकाराच्या देशी तुरीचे दर आठ हजार रुपयांपर्यंत आहेत. तूर दर मागील महिन्यात साडेसहा ते सात हजार २०० रुपये होते. परंतु सध्या एकच म्हणजेच साडेसात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

खानदेशात दोन हजार हेक्टरवर लागवड

खानदेशात तूर लागवड कमी झाली होती. ती सर्वत्र मिळून सुमारे दोन हजार हेक्टर होती. जळगावात फक्त रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व चाळीसगाव भागात काही शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून तूर लागवड केली होती.

कमाल कापूस उत्पादकांनी आपल्या कुटुंबापुरती तूर लागवड कापसात आंतरपीक म्हणून केली होती. अनेक शेतकऱ्यांनी गावातच तुरीची विक्री केली. यामुळे बाजारात आवक अल्प राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT