Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : विदर्भात तुरीचे दर १० हजारांवर स्थिरावले

Tur Rate : स्टॉक लिमिट लावल्यानंतर बाजारात तुरीचे दर खाली येतील अशी अपेक्षा होती.

Team Agrowon

Nagpur News : स्टॉक लिमिट लावल्यानंतर बाजारात तुरीचे दर खाली येतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार विदर्भातील काही बाजार समित्यांमध्ये दर १० हजार रुपयांच्या खाली आले आहेत तर काही बाजार समित्यांत दरातील सुधारणा कायम असल्याची स्थिती आहे.

हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीमध्ये तुरीची ११८१ क्‍विंटल आवक होत दर ९१०० ते १०४८५ याप्रमाणे होते. शेगाव बाजार समितीमध्ये मात्र दरात काहीशी घसरण नोंदविण्यात आली होती. या ठिकाणी तुरीला ९००० ते ९८०० रुपयांचा दर मिळाला.

दर्यापूर (अमरावती) बाजार समितीमधील आवक १५७९ क्‍विंटलची तर दर ८३०० ते १०१७५ याप्रमाणे होते. मंगळवारी (ता. २०) यवतमाळ बाजार समितीत तुरीला ९०००-९९४५ रुपये असा दर मिळाला. खामगाव (बुलडाणा) बाजारातील तुरीचे दर ७७०० ते १०२०० होते. मालेगाव (वाशीम) बाजारातदेखील दर दहा हजारांच्च्या खाली मिळाले.

९००० ते ९४०० याप्रमाणे तुरीचे या ठिकाणी व्यवहार झाले. स्टॉक लिमिटची अंमलबजावणी होईपर्यंत तुरीच्या दराने चांगलीच झेप घेतली होती. १०८०० रुपयांपर्यंत दर पोहोचले होते. त्यानंतरच्या काळात मात्र दर दहा हजार रुपयांच्या आसपास राहिले आहेत.

काही बाजार समित्यांमध्ये मात्र १५०० असाही दर मिळत आहे. अमरावती बाजार समितीत रब्बी हंगामातील हरभरा आवकही वाढली आहे. ४५५० ते ४८५१ याप्रमाणे मंगळवारी (ता. २०) हरभऱ्याला दर मिळाला.

सोयाबीनची आवक वाढली

तुरीसोबतच सोयाबीनच्या दरातही सुधारणा झाली. त्याच्या परिणामी हंगामाची सोय म्हणून शेतकऱ्यांकडून साठवून ठेवलेला शेतीमाल विक्रीसाठी आणला जात आहे. मंगळवारी (ता. २०) अमरावती बाजार समितीत सोयाबीनला ४८०० ते ५००० रुपये दर मिळाला. यापूर्वी सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते.

परिणामी आवक कमी होती. बाजारात तूर विक्रीवरदेखील शेतकऱ्यांचा भर असून मंगळवारी ९६०० ते ९८५१ रुपये क्विंटलप्रमाणे तुरीचे व्यवहार झाले. मॉन्सून लांबला असला तरी तो केव्हाही बरसण्याची शक्यता पाहता ऐनवेळी धावपळ होऊ नये याकरिता बाजार समिती प्रशासनाने शेडमधील मालाची उचल करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहिती सभापती हरीश मोरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT