Tractor Sale  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Tractor Market : ट्रॅक्टर विक्रीत मेमध्ये पाच टक्क्यांची वाढ

Team Agrowon

Pune News : देशात यंदा रब्बी हंगाम चांगला राहिल्याने ट्रॅक्टरची विक्री वाढत आहे. मे महिन्यात ट्रॅक्टर विक्री एप्रिलच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढली असून एकूण ८३ हजार २६७ ट्रॅक्टर्सची विक्री झाली, असे ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण असोसिएशनने म्हटले आहे.

मे महिन्यात देशातील ट्रॅक्टर विक्री २ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. देशात या महिन्यात ८३ हजार २६७ ट्रॅक्टरची विक्री झाली. ही विक्री एप्रिल महिन्याच्या तुलनेत ५ टक्क्यांनी अधिक होती. एप्रिल २०२३ मध्ये देशात एकूण ७९ हाजर २८८ ट्रॅक्टर विकले गेले, असे ‘असोसिएशन’ने म्हटले आहे.

ट्रॅक्टर उद्योगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात यंदा रब्बी हंगाम चांगला साधला. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. यामुळे ट्रॅक्टर उद्योगालाही दिलासा मिळाला आहे.

‘इस्कॉर्ट कुबोटा’च्या ट्रॅक्टर विक्रीत मे महिन्यात १३.५ टक्के वाढ झाली आहे. ‘कुबोटा’ने मे महिन्यात ८ हजार ७०४ ट्रॅक्टर्सची विक्री केली. शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद कायम असल्याने देशातील सर्वच भागांमध्ये ट्रॅक्टर विक्री चांगली झाली, असे ‘कुबोटा’च्या वतीने सांगण्यात आले.

महिंद्रा आणि महिंद्राच्या विक्रीत ३ टक्क्यांची वाढ झाली होती. महिंद्राने देशातील बाजारात ३३ हजार ११३ ट्रॅक्टरची विक्री केली. ट्रॅक्टरची मागणी पुढील काळातही कायम राहील, असा विश्वास महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला. एकूणच ट्रॅक्टर उद्योगाला पुढील काळातही विक्री सकारात्मक राहण्याची आशा आहे.

हवामान विभागाने यंदा देशात सरासरी पाऊसमान व्यक्त केले. जलाशयांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच देशातील आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडत आहेत. शेतकऱ्यांना खरेदीसाठी पतपुरवठाही होत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगाला चांगल्या व्यवसायाची आशा आहे.

उत्पादन कमी राहिले

मे महिन्यात ट्रॅक्टरची विक्री जास्त झाली. मात्र ट्रॅक्टर उत्पादन ७९ हजार ९२८ युनिट झाले होते. २०२२ च्या मे महिन्यातील ट्रॅक्टरचे उत्पादन १ लाख ३ हजार ५६३ युनिट झाले होते.

निर्यात वाढली

मे महिन्यात निर्यातीतही वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातील ट्रॅक्टर निर्यातीत ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. पण मे २०२२ चा विचार करता यंदाची निर्यात २८ टक्क्यांनी कमी राहिली. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात ११ हजार ५८२ ट्रॅक्टरची निर्यात झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT