Tractor Engine Service : ट्रॅक्टर इंजिनची स्वच्छता करताना कोणत्या गोष्टी टाळाल?

Agriculture mechanization : सध्या शेती मशागतीची कामे आवरली आहे. शेतकरी मॉन्सूनची वाट पाहतोय. राज्यात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
Tractor Engine Service
Tractor Engine ServiceAgrowon
Published on
Updated on

Tractor Engine Update : सध्या शेती मशागतीची कामे आवरली आहे. शेतकरी मॉन्सूनची वाट पाहतोय. राज्यात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु अनेकदा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या इंजिनकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यानं मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

त्यामुळे ट्रॅक्टरच्या इंजिनची वेळोवेळी काळजी घेणे आणि त्याला स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येईल. त्यामुळे आता आपण जाणून घेणार आहोत, ट्रॅक्टर इंजिनची कशी काळजी तेच.

तर ट्रॅक्टरच्या इंजिनवर अनेकदा माती, काडीकचरा आणि बारीक धूळ सचलेली असते. त्यामुळे त्याची स्वच्छता आवश्यक ठरते. इंजिनची स्वच्छता करण्यापूर्वी ट्रॅक्टरच्या बॅटरीचं धन आणि ऋण वायर कनेक्शन काढून ठेवावेत.

जेणेकरून कुठलाही स्पार्क उडणार नाही. तसेच बॅटरी कनेक्ट असताना इंजिनवर पाणी टाकू नये. अन्यथा ट्रॅक्टरची बॅटरी जळण्याची शक्यता असते. त्यामुळे इंजिनची स्वच्छता बॅटरीची काळजी घेऊनच करावी.

Tractor Engine Service
Tractor Ploughing : ट्रॅक्टरने जमीन नांगरताना अशी काळजी घ्या

अनेकदा ट्रॅक्टरची विद्युत भाग जशी बल्ब आणि इंडीकेटर यासारख्या यांच्यावर पाणी टाकू नये. तसेच पाणी जाऊ नये म्हणून सदर भाग प्लॅस्टिकने झाकून ठेवावीत. अन्यथा या भागात पाणी शिरून बल्ब आणि इंडीकेटर जळू शकतात. त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी.

इंजिनची स्वच्छता करताना कापडाऐवजी ब्रश किंवा हवेच्या प्रेशरनं करावी. तसेच इंजिनच्या फटीत विशेष लक्ष देऊन स्वच्छता करावी.

तसेच डिग्रीसरचा वापर करून इंजिनवर साचलेली ग्रीस थर स्वच्छ करावेत. त्यासोबतच बाजारात उपलब्ध असणारे स्पंज आणि ब्रशचा वापर करून इंजिनची स्वच्छता करता येते. ट्रॅक्टरच्या कुलिंग पंख्याची काळजी पूर्वक स्वच्छता करावी, अन्यथा पंख्याचे पाते तुटून आर्थिक नुकसान होऊ शकतं.

पावसाळ्यात ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये पाणी जाऊ नये म्हणून ट्रॅक्टर निवाऱ्यात उभं करावं. किंवा ट्रॅक्टरवर प्लॅस्टिकचं आवरण घालावं. स्वच्छता केल्यानंतर इंजिन लगेच सुरू करू नये. त्याला कोरडं करून मग सुरू करावं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com