Tomato Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Rate : टोमॅटो दरातून उत्पादन खर्चही निघेना; १०० रुपये क्रेट दरानं विक्री

यंदा दुष्काळ आणि अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांच्या कष्टावर पाणी फेरलं आहे. टोमॅटोचे दरावरील दबावाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली.

Dhananjay Sanap

यंदा दुष्काळ आणि अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांच्या कष्टावर पाणी फेरलं आहे. टोमॅटोचे दरावरील दबावाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली. एरव्ही टोमॅटो दर वाढले की, ओरड सुरू होते. पण सध्या मात्र १०० रुपये क्रेट दराने टोमॅटो विकला जात असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर १०० रुपये किलोवर पोहचले होते. त्यामुळे टोमॅटो उत्पादक रातोरात श्रीमंत झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पण ही दरवाढ फार काळ टिकली नाही. त्यात बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना चांगल दर मिळाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात टोमॅटो दर दबावात आले आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.

उत्पादन खर्च वसूल होत नाही

टोमॅटो नाशवंत शेतमाल आहे. त्यात लागवडीची अचूक आणि वेळेवर आकडेवारी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो. परिणामी टोमॅटो उत्पादक सातत्याने जोखीम घेऊन लागवड करतात. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात टोमॅटोला सरासरी ६०० ते ९०० रुपयांचा दर मिळतो. तोही चांगल्या प्रतिच्या मालाला. खराब माल तर फेकून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

नारायणगाव येथील शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीचे सतीश पाटे म्हणाले, "यंदा उष्णतेमुळे माल आधीच तयार झाला. त्यामुळे सीझन लवकर आला. तसेच उत्तर भारतातील माल बाजारात दाखल होऊ लागल्याने दरावर दबाव आहे. गेल्यावर्षी एप्रिल-मे दरम्यान २० किलोच्या क्रेटला १ हजार ६०० ते २ हजार २०० रुपयांचा दर मिळत होता. पण सध्या मात्र नारायणगाव बाजारात एका क्रेटला ५० ते ६० रुपये दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली," असेही पाटे सांगतात.  

उत्तर भारतातून आवक

यंदा राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्ट्यात उष्णता आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना दणका दिला. त्यामुळे टोमॅटोची उत्पादकता आणि गुणवत्ता घटली. पण दुसरीकडे मात्र उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब राज्यातील टोमॅटोची आवक बाजारात सुरू झाली. सध्या त्याचा दबाव टोमॅटो दरावर जाणवत असल्याचे जाणकार सांगतात.

८० ते ९० रुपये क्रेटचा दर

नाशिक जिल्ह्यात मार्च एप्रिल महिन्यात टोमॅटोला २०० ते २२० रुपये क्रेटचा दर मिळत होता. पण सध्या ८० ते ९० रुपये क्रेटचा दर मिळत असल्याचं सिन्नरचे शेतकरी गोकुळ आव्हाड सांगतात. राज्यात पुरेशा क्षमतेची कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध नाही. टोमॅटो प्रक्रिया उद्योगही प्यूरी आणि सॉसवर अडकून पडला आहे. त्यामुळे नवीन पर्याय शोधणं गरजेचं असल्याचं जाणकार सांगतात. टोमॅटो काढणीनंतर विकल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्याचा टोमॅटो उत्पादकांना सातत्याने फटका बसतो. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची मेहनत वाया जाते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीला आली गती

Ethanol Industry: राज्यात जितका उपयोग तितकेच इथेनॉल खरेदी

Parth Pawar Land Controversy: चौकशी समितीच्या अहवालात सर्व तथ्ये समोर येतील : पवार

Cotton Production: खानदेशात एक लाख कापूसगाठींचे उत्पादन

Soybean Rate: मध्य प्रदेशात सोयाबीनला १३०० रुपये भाव फरक

SCROLL FOR NEXT