Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

Tomato Crop : ऊस तोडणीनंतर शेतकऱ्यांची टोमॅटोला पसंती
Tomato Cultivation
Tomato CultivationAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : आंबेगाव तालुक्यातील शाश्वत पाणी असणाऱ्या बागायती भागात शेतकरी टोमॅटो लागवड करण्यात व्यस्त आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आदी तालुके टोमॅटो पिकाचे आगार म्हणून ओळखले जातात. उन्हाळ्यात ऊस तोडणी झाल्यानंतर या भागातील शेतकरी आता टोमॅटो पिकाकडे वळला असून लागवडीला चांगलाच वेग आला आहे.

गतवर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटोला समाधानकारक भाव मिळाला नसला तरी शेतकरी दरवर्षी प्रमाणे मे महिन्यात टोमॅटोची लागवड करत आहेत. मेमध्ये लागवड केलेल्या टोमॅटोला चांगला भाव मिळेल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. टोमॅटो लागवड म्हणजे धाडसाचे काम आहे. दर चांगला मिळाला तर फायदा नाहीतर संपूर्ण पीक जागेवर सोडून द्यावे लागते. अशी परिस्थिती असताना देखील तालुक्यातील शेतकरी टोमॅटो लागवडीला पसंती देत आहेत.
आंबेगाव तालुक्यात लाखणगाव, पोंदेवाडी, पारगाव, जारकरवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी, पिंपळगाव, चांडोली, कळंब, म्हाळुंगे पडवळ, घोडेगाव, शिंगवे, नागापूर आदी गाव परिसरात शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत.

Tomato Cultivation
Ambegaon Onion Cultivation : आंबेगाव तालुक्यात रब्बीच्या कांदा लागवडीला प्रारंभ

उत्पादन खर्चात वाढ, दरातील चढ- उतार, गारपीट, अवकाळी पाऊस, तापमान वाढ, किडीचा प्रादुर्भाव, फूल गळती व वेगवेगळे रोग यासह अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तरीही टोमॅटोचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करून टोमॅटोच्या उत्पादनात वाढ केली आहे. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोगांपासून संरक्षणासाठी चार बाजूंनी जाळी, रोपे जगवण्यासाठी छोटी संरक्षण पाइप,
विविध किट, विविध प्रकारच्या फवारण्या, आळवणी तसेच चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

मेमध्ये दरवर्षी टोमॅटोच्या रोपांची मागणी वाढते. यात ‘आर्यमन’, ‘६२४२’, ‘मेघदूत’ या वाणांच्या रोपांची मागणी असते. विशेषतः ‘मेघदूत’ सर्वाधिक मागणी आहे. परंतु पूर्वमोसमी पावसाचा फटका बसल्याने नव्वद हजार टोमॅटो रोपांचे नुकसान झाले. मंगळवारपर्यंत (ता. १४) एक लाख टोमॅटो रोपांचे वितरण केले. सव्वा लाख रोपांची बुकिंग आहे.
- शरद कुलाळ, श्रीजय हायटेक नर्सरी, पारगाव कारखाना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com