Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : टोमॅटोचा बाजार दबावातच; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच काय आहेत हरभरा दर ?

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे आज १२.४२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयातेल ४६ सेंट प्रतिपाऊंड आणि सोयापेंड ३७२ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते.

देशात मात्र सोयाबीन ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांची पातळी सोडताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढ उतार दिसून येत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. लागवडी एकाच वेळी तोडणीला आल्या आणि बाजारात आवक वाढत असल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये अगदी ५०० रुपये प्रतिक्विंटलपासून सुरु होत आहे.

तर देशातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ९०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

हरभऱ्याचा भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हरभऱ्याच्या भावात पुन्हा एकदा सुधारणा दिसून आली आहे. हरभऱ्याचा भाव मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा ३०० रुपयांनी सुधारला. सध्या अनेक बाजारांमध्ये हरभरा ६ हजारांवर पोचला.

तर सरासरी भावपातळी सध्या ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावापतळी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्याससांनी व्यक्त केला. 

तुरीची भावपातळी मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे. तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे. काही आठवड्यांपुर्वी तुरीच्या भावात आलेली काहीसे नरमाई दूर झाल्याचे दिसत आहे.

देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री, इथेनाॅल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केला जात आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT