Agrowon Podcast : गव्हाच्या भावात सुधारणा ; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काय आहेत गहू दर ?

Market Update : आपण कापूस, सोयाबीन, हळद, गहू आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १२.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचा भाव आजही ३७२ डाॅलर प्रतिटनांवर होता.

देशातील बाजारात सोयाबीन  आजही ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव देशातही दिसून येत आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाचे वायदे आज काहीसे नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदेबाजारांमध्येही ही परिस्थिती होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज ७६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील वायदे कालच्या तुलनेत आज २०० रुपयांनी कमी होऊन ५७ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर बाजार समित्यांमधील कापसाचा भाव आजही ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. कापूस बाजारावर सध्या वेगवेगळ्या घटकांचा दबाव असून ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कापूस भाव दबावातच ; कापूस, सोयाबीन, हळद तसेच काय आहे आल्याचे दर ?

राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे भाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्यानंतर ज्वारीच्या भावात आलेली नरमाई आजही कायम आहे. ज्वारीची बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी झालेली दिसते.

तरीही ज्वारीचे भाव ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहे. बाजारात ज्वारी व्हरायटी आणि गुणवत्तेनुसार भाव खात आहे. ज्वारी बाजारातील दराची ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Turmeric Market : राजापुरी हळदीची उलाढाल २५८ कोटींनी वाढली

हळदीचे भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहेत. हळद बाजारातील तेजी हंगामाच्या आधीपासूनच आहे. यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात गव्हाची भावपातळी काहीशी वाढली..देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे सरकारची गहू खरेदीही सुरु आहे. याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे. सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत.

देशभरात सध्या गव्हाला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com