Tomato Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tomato Market : टोमॅटो फुकट न्या म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Tomato Rate : शेतकऱ्याला अक्षरशः टोमॅटो बाजारात तसाच सोडून द्यावा लागला. धाराशिव येथून टोमॅटो बाजारात आणण्यासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च झाला. शेतकऱ्याचा खर्चही वसूल झाला नाही, असे व्यापारी लहू कोळेकर, गणेश झगडे यांनी सांगितले.

Team Agrowon

Pune News : येथील महात्मा फुले बाजारात धाराशिव जिल्ह्यातून एका शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीसाठी आणलेला होता. अतिशय चांगल्या प्रतीचा माल होता. परंतु त्याला उठाव नसल्याने टोमॅटो तसाच पडून राहिला. भावही घसरलेले होते. मालवाहतुकीचा खर्चही वसूल होत नव्हता.

रविवारी (ता. १) अक्षरशः त्या शेतकऱ्याला ‘टोमॅटो फुकट न्या’ अशी म्हणण्याची वेळ आली. टोमॅटोला फक्त तीन, चार रुपये प्रति किलोला भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च व वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्याला त्याच्या खिशातील पैसे भरावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, अशी व्यथा धाराशिव येथील शेतकरी सचिन नायकंदे यांची झाली.

शेतकऱ्याला अक्षरशः टोमॅटो बाजारात तसाच सोडून द्यावा लागला. धाराशिव येथून टोमॅटो बाजारात आणण्यासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च झाला. शेतकऱ्याचा खर्चही वसूल झाला नाही, असे व्यापारी लहू कोळेकर, गणेश झगडे यांनी सांगितले.

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात सुमारे दहा टन टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोला किमान तीन ते कमाल चार रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने परजिल्ह्यांतून जे शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी घेऊन येतात त्यांना हातात काहीच मिळत नाही. त्यांची झीरो पट्टी होते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे, व्यापारी लहू कोळेकर, महेंद्र गोरे, रवींद्र बोराटे, चांगदेव बोराटे, गणेश झगडे, धनंजय बोराटे, संजय वहिले, जोतिबा गोरे यांनी सांगितले.

टोमॅटो अगदी ३ ते ४ रुपये प्रति किलोने घाऊक बाजारात विकला गेला. टोमॅटोची आवक अधिक व ग्राहकांची मागणी कमी असल्यामुळे टोमॅटोचे भाव गडगडले आहेत, असे भयानक वास्तव आहे. बाजारात सुमारे तीस टनांवर टोमॅटो विकण्यासाठी आला होता.

दोन महिन्यांभरापूर्वी टोमॅटोचे भाव राज्यातही आणि चाकण बाजारात उच्चांकी, प्रति किलोला अगदी १२० रुपये झाले होते. टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

बुलडाणा, नंदुरबार येथील सुमारे पंचवीस टन हिरव्या मिरचीची आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव गेल्या महिन्यात घाऊक बाजारात एका किलोला शंभर रुपयांपर्यंत गेले होते. आज ३० ते ४० रुपये प्रति किलोने घाऊक बाजारात हिरवी मिरची विकली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT