Tomato Market : घाऊक बाजारात टोमॅटो दहा रुपये किलो

Tomato Rate : दोन महिन्यांपूर्वी दोनशे रुपये किलोवर गेलेले टोमॅटो आता घाऊक बाजारात आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे.
Tomato Market
Tomato Market Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : दोन महिन्यांपूर्वी दोनशे रुपये किलोवर गेलेले टोमॅटो आता घाऊक बाजारात आठ ते दहा रुपये किलोने विकला जात आहे. यातून वाहतूक खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मात्र उत्पादित मालाची विल्हेवाट कशी लावावी, या विवंचनेपायी त्यांना नाईलाजाने टोमॅटो बाजारात आणावा लागत आहे.

येथील बाजार समितीत प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातून तसेच नगर, संगमनेर या भागांतूनही टोमॅटोची आवक होते. तर स्थानिक पातळीवर आजूबाजूच्या खेड्यांतून गावरान टोमॅटो येतो. जून-जुलैमध्ये टोमॅटो २५० रुपये किलोने विकला गेला.

Tomato Market
Tomato Market : पिंपळगाव बसवंतमध्ये विक्रमी ३ लाख टोमॅटो क्रेटची आवक

देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. त्यावर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये नेपाळमधून टोमॅटो आयात केला व भाव खाली आले. त्यानंतर मात्र टोमॅटोचे दर चढले नाहीत. याउलट त्याचे दर इतके खाली आलेत की आता उत्पादक शेतकऱ्यांच्याच डोळ्यांत पाणी आले आहे.

Tomato Market
Tomato Market : सौद्याप्रमाणे शेतकऱ्यांना टोमॅटोचे पैसे न दिल्यास कारवाई

स्थानिक बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे दर नीचांकी पातळीवर आले आहेत. ८ ते १० रुपये किलोने घाऊक बाजारात टोमॅटोची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात पंधरा ते वीस रुपयांवर तो स्थिरावला. येथील बाजार समितीच्या भाजीबाजार यार्डावर शनिवारी (ता. २३) टोमॅटोच्या १४० क्रेटची आवक झाली व ६०० ते ९०० रुपये भाव मिळाल्याची माहिती आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी टोमॅटोला उच्चांकी दर मिळाले. त्या वेळी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. उत्पादकांची चांदी झाली, असे बोलले जात होते. टोमॅटोच्या चोरीच्या घटनाही घडल्या. आता मात्र टोमॅटोला कुणी विचारेनासे झाले आहे.

वाहतूक खर्चही परवडेना

बाजारातील सध्याचे दर बघता उत्पादकांना टोमॅटो बाजारात आणण्याचा वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. मात्र ठेवायचा कुठे व त्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न असल्याने नाइलाजाने नुकसान सहन करीत ते बाजारात आणण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com