Meat Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Meat Industry : मांस उद्योगाची उलाढाल पोहचली साडेचार लाख कोटींवर

Meat Export Update : भारतातील मांस उद्योगाची उलाढाल तब्बल साडेचार लाख कोटीवर असून तब्बल ३७ हजार कोटी रुपयांची मांस निर्यात देशातून होते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : भारतातील मांस उद्योगाची उलाढाल तब्बल साडेचार लाख कोटीवर असून तब्बल ३७ हजार कोटी रुपयांची मांस निर्यात देशातून होते. त्यामुळेच मांस उत्पादन आणि निर्यातीत भारताचे स्थान जगात पाचव्या क्रमांकावर असल्याची माहिती हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस.बी. बारबुद्धे यांनी दिली.

नागपूर दौऱ्यावर असताना डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी याविषयी माहिती दिली त्यानुसार, २०२० या वर्षातील नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार भारतात मांस खाणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७१ टक्‍के आहे. मांस आणि मासोळी खाणाऱ्यांची संख्या मिळून हे प्रमाण ७७ टक्‍केपर्यंत जाते. परिणामी देशात पशुपालनातून आर्थिक सक्षमतेचाही उद्देश साधला जात आहे.

परसबागेतील कुक्‍कुटपालन ४६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मांसाला मागणी असल्यामुळे या उद्योगाच्या कामी येणाऱ्या उत्पन्नक्षम अशा पशूंच्या संगोपनावर भर दिला जात असल्याचे निरीक्षण आहे. या सर्व कारणामुळे भारताच्या मांस उद्योगालाही सुगीचे दिवस आले आहेत. अपेडाकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, मांस उत्पादन, निर्यात आणि वापर या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत भाजप पाचव्या क्रमांकावर आहे.

या यादीत ब्राझील पहिल्या, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताची वार्षिक मांस उलाढाल साडेचार लाख कोटी रुपये इतकी आहे. भारतातून एकूण ३७ हजार कोटी रुपयांच्या मांसाची निर्यात होते; त्यामध्ये ३१ हजार कोटी रुपये किमतीचे मांस हे केवळ म्हशीचे असते, असेही डॉ. बारबुद्धे यांनी सांगितले.

मांस निर्यातीच्या बाबतीत आपण जगात पाचव्या क्रमांकावर आहोत. ही बाब समाधानाची असली तरी स्थानिकस्तरावर मांस उत्पादन क्षेत्रातील अस्वच्छतेमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती असते. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. क्षुल्लक सुधारणा केल्यास या क्षेत्राचा विस्तार आणि उलाढाल वाढणार आहे.
डॉ. एस.बी. बारबुद्धे, संचालक, केंद्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture : दुष्काळी परिस्थितीत एकात्मिक शेती पद्धत हवी

Agriculture Crisis : पेरणीचा खर्चही निघेना, सांगा जगायचे कसे?

Sugarcane Fire Incident: वीट येथे शॉर्ट सर्किटमुळे ५ एकर ऊस जळून खाक

Amravati Water Supply: अमरावतीला उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही

Sugar Factory Water Conservation: साखर कारखान्यांनी पाण्याची काटकसर करावी:जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

SCROLL FOR NEXT