Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : साताऱ्यात सोयाबीन हमीभाव केंद्राकडे प्रतिसाद कमीच

Soybean Market : दसरा, दिवाळीला खरीप हंगामातील पैसे मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते.

विकास जाधव 

Satara News : दसरा, दिवाळीला खरीप हंगामातील पैसे मिळवून देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते. यामुळे खरिपात सर्वाधिक सोयाबीनची लागवड असल्याने उत्पादनही सर्वाधिक झाले आहे. पहिल्या टप्प्यात ज्या वेळी सोयाबीनची काढणी झाली, त्या वेळी सोयाबीनची हमीभाव केंद्रे सुरू झाली नाहीत.

यांचा परिणाम सुरू असलेल्या केंद्रावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील पाच हमीभाव खरेदी केंद्रांवर ३४३१ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. एकूण उत्पादन व झालेली खरेदी बघता हमीभाव केंद्राकडे नोंदणी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचेच जिल्ह्यात दिसत आहे.

खरीप हंगामातील दरवर्षी सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनचीच केली जाते. यंदाही जिल्ह्यात ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा टप्प्याटप्प्याने पाऊस झाल्याने सोयाबीनचे पीक चांगले येऊन दरही वाढल्याने चार पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

केंद्राचे नाव-नोंदणीकृत शेतकरी

संख्या-सोयाबीन खरेदी (क्विंटलमध्ये)

सातारा ६५ शेतकरी ५२७

कोरेगाव १४७ शेतकरी १६६५.६३ क्विंटल

कऱ्हाड २२ शेतकरी ०० क्विंटल

मसूर ४५ शेतकरी ३३०.५१ क्विंटल

फलटण १२१ शेतकरी ९०९ क्विंटल

नोंदणीसाठी मुदतवाढ

सोयाबीनच्या हमीभाव केंद्रात सोयाबीन घालण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. हमीभावाने खरेदी करण्यासाठी आवश्यक तो प्रतिसाद न मिळाल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पहिल्यांदा मुदतवाढ देण्यात आली.

त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पणन विभागाला शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी ३० नोव्हेंबर त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. मात्र नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT