Soybean Market : सोलापुरात सोयाबीनची केवळ १० हजार क्विंटलचीच खरेदी

Soybean Rate : यंदा जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, बार्शीवगळता अन्यत्र सोयाबीन काढणी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीसाठी ११ हमीभाव खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. पण या केंद्रांपैकी सात केंद्रांवर आतापर्यंत ६७३ शेतकऱ्यांकडून केवळ १० हजार ३६७ क्विंटल सोयाबीनचीच खरेदी होऊ शकलेली आहे. तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांच्या निरुत्साहामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.

यंदा जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, बार्शीवगळता अन्यत्र सोयाबीन काढणी हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली. सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये इतका हमीभाव आहे.

Soybean Rate
Soybean Oil Rate : बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिलिटर आठ टक्क्यांची वाढ

हमीभावाने खरेदीसाठी ई पीक पाहणी अॅपवर नोंदणी बंधनकारक आहे. पण सतत बंद पडणारे पोर्टल आणि या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर हेक्टरी १२.२४ क्विंटलपर्यंतच्या खरेदीलाच असणारी मर्यादा, शिवाय अनेक शेतकऱ्यांकडून त्याची नोंदणी झालेली नाही.

तसेच खरेदीसाठी १५ टक्के आर्द्रता आवश्यक आहे. यासारख्या तांत्रिक अडचणीही शेतकऱ्यांच्या कमी प्रतिसादामागे सांगितल्या जातात. त्यामुळेच केवळ सात केंद्रांवरच खरेदी होऊ शकलेली आहे.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीन खरेदीला चांदवड येथे प्रारंभ

सोयाबीनच्या खरेदीसाठी आतापर्यंत २७७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १३५२ शेतकऱ्यांना मेसेजही पाठवण्यात आलेले आहेत. पण त्यापैकी केवळ ६७३ शेतकऱ्यांनीच त्यांच्याकडील सोयाबीन या केंद्रांवर विक्रीसाठी आणले आणि त्यातून १० हजार ३६३ क्विंटल सोयाबीनची खरेदी होऊ शकली आहे.

बार्शी, अक्कलकोटला बऱ्यापैकी खरेदी

बार्शी तालुक्यातील केंद्रावर १ हजार ५६० शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक २९६ शेतकऱ्यांकडून ४ हजार २५५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील केंद्रावर ३७ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. बाकी अन्य पाच केंद्रांवर मात्र अगदी जेमतेम खरेदी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com