Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Soybean Market : सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली. त्यामुळे भविष्यात सोयाबीन दरातही तेजी अनुभवता येईल. देशांतर्गंत प्रक्रिया उद्योगांचे पुर्नजीवन होण्यास यामुळे मदत झाली आहे, असे प्रतिपादन सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी केले.

इंदूर (मध्य प्रदेश) येथे ब्रिलियंट कन्‍व्हेशन सेंटरमध्ये आयोजित दोन दिवसीय सोयाबीन कार्यशाळेत निमित्ताने ते बोलत होते. डेविश जैन पुढे म्हणाले, की चालू हंगामात खाद्यतेलाची आयात २२५ लाख टन होईल, अशी अपेक्षा आहे. खाद्यतेलाची मागणी आणि पुरवठा यात मोठी दरी आहे. त्यामुळे खाद्यतेलाची आयात करावी लागते.

त्यावर देशाचे मोठे परकीय चलन खर्ची होते. ही बाब लक्षात घेता देशांतर्गंत तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता नॅशनल ऑइल मिशनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सोयाबीन प्रोसेसन केंद्र सरकारच्या या पावलाचे स्वागत करीत आहे. यामुळे येत्या काळात देशांतर्गंत लागणाऱ्या ७२ टक्‍के तेलबियांची गरज भागविणे शक्‍य होणार आहे.

२०३०-३१ या वर्षात तेलबियावर्गीय पिकाचे उत्पादनाचे उद्दिष्ट ६९७ लाख टन निश्‍चित करण्यात आले आहे. सध्या ते केवळ ३९० लाख टन इतके अत्यल्प आहे. भारताला दर वर्षी २००० कोटी रुपये खाद्यतेलाच्या आयातीवर खर्ची घालावे लागतात. त्यामुळे केंद्राने या क्षेत्रात उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. संजीव आस्थाना म्हणाले, की सोयाबीन बाजारात सरकारने हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी केल्यास दर हमीभावाच्या वर जातील. खरेदीत सरकार मागे पडल्यास पडझडीची शक्‍यता आहे. तेल उद्योगाला आयात शुल्कात १० टक्‍के वाढीची अपेक्षा होती. परंतु सरकारने २० टक्‍के आयात शुल्क वाढविल्याने तेल उद्योगही हैराण आहे.

यावरही झाले मंथन

युक्रेन, रशिया, पोलंड या देशांमध्ये सूर्यफुलाचे उत्पादन १५ ते २० लाख टन कमी होईल.

पूर्वी भारत ७० टक्‍के युक्रेन व ३० टक्‍के रशियातून सूर्यफूल तेलाची आयात करीत होता.

युद्धानंतर मात्र रशियाकडून ७० व युक्रेनकडून ३० टक्‍के तेल आयात होत आहे.

टर्की जगभरातून सूर्यफूल तेलाची आयात करून त्यावर प्रक्रिया करीत सूर्यफूल तेल इराणला विकत आहे.

नोव्हेंबर महिन्यात भारतात खाद्यतेलाची आयात वाढेल.

सूर्यफूल तेलाच्या दरात तेजी कायम राहील.

सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढीची शक्‍यता.

भारतात दर महिन्याला १८ लाख टन खाद्यतेलाच्या आयातीची शक्‍यता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT