Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तुरीचा भाव पुन्हा हजारांच्या पार; शेतकऱ्यांनी गेम फिरवला?

Tur Rate : देशातील बाजारात बहुतांश ठिकाणी तुरीचे भाव क्विंटलला ९ हजारांपेक्षा जास्त होते. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी टिकून राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर तुरीच्या भावावर दबाव येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात तुरीचा भाव पुन्हा वाढला. आजही देशातील बाजारात बहुतांश ठिकाणी तुरीचे भाव क्विंटलला ९ हजारांपेक्षा जास्त होते. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी टिकून राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 

देशात यंदा तुरीची लागवड कमी झाली होती. त्यातच कमी पाऊस आणि पावसातील खंडाचा तूर पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे तुरीचे उत्पादन जास्त कमी राहील, असा अंदाज शेतकरी आधीपासूनच व्यक्त करत आहेत. मागच्या वर्षीही तुरीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे शिल्लक साठा खूपच कमी होता. यामुळे तुरीच्या पुरवठ्याची भीस्त ही चालू हंगामातील उत्पादनावरच होती. पण यंदाच्या हंगामातही उत्पादन घटल्याने पुरवठा कमीच राहील, असे सांगतिले जात होते. 

पण सरकारने आयात वाढविण्यासठी प्रयत्न सुरु केले. आयतही सुरु झाली. त्यातच नवा माल बाजारात सुरु झाला. त्यामुळे तुरीच्या भावात काहीशी घट येईल आणि भाव ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आवक जास्त असलेल्या काळात पोचेल, असा अंदाज बाजाराने गृहीत धरला होता. झालेही तसे. अनेक ठिकाणी तुरीचा बाजार ८ हजारांच्या खाली गेला होता. त्यातच आवक वाढून भाव आणखी कमी होईल, अशी अपेक्षा स्टाॅकीस्ट आणि प्रक्रियादार व्यक्त करत असताना तूर उत्पादकता अपेक्षेपेक्षा जास्तच कमी असल्याचे स्पष्ट झाले. 

भावाला कशाचा आधार?

तुरीचे उत्पादन कमी राहील यामुळे भावही जास्त राहतील, हे शेतकऱ्यांनी हेरले. कारण मागच्या सहा महिन्यांपासून तुरीच्या भावात तेजी आहे. ही तेजी आपल्यालाही साधता येईल यामुळे शेतकऱ्यांनी तुरीची विक्री कमी केली.

त्यातच सरकारने बाजारभावाने तूर खरेदीचा निर्णय घेतला. यामुळे तुरीच्या भावाला आधार तयार झाला. सध्या सरकारच्या तूर खरेदीचाही भाव ९ हजार ते ९ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर बाजारभावही याच दरम्यान दिसतो. त्यामुळे पुढील काळातही तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT