Tur Procurement : तूर खरेदीला मिळेना प्रतिसाद

Tur Market : बाजारभावानुसार सरासरी किमतीने तूर खरेदीसाठी नोंदणीला प्रतिसादच मिळत नसल्याची स्थिती आहे.
Tur Production
Tur ProductionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : बाजारभावानुसार सरासरी किमतीने तूर खरेदीसाठी नोंदणीला प्रतिसादच मिळत नसल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर केवळ तीन शेतकऱ्यांची नोंदणी परिपूर्ण असल्याची स्थिती आहे.

राज्य शासनाने ‘पीएसएफ’ योजनेअंतर्गत बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर व गंगापूर या दोन ठिकाणी केंद्र सुरू केले. १३ डिसेंबरपासून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले.

Tur Production
Tur Market : बाजारात तूर खातेय भाव

प्रत्यक्षात २३ जानेवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन केंद्रावर ३५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांची नोंदणी परिपूर्ण आहे. शासनाच्या बाजारभावानुसार तूर खरेदीकरिता मंगळवारी (ता. २३) जिल्हानिहाय दर जाहीर करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वात कमी

५ हजार ९४६ रुपये १९ पैसे प्रतिक्विंटल, तर लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ९७८४ रुपये प्रतिक्विंटल दराने दूर खरेदी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शासनाच्या तूर खरेदीचे दर बरी दिसत असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा शासनाच्या खरेदीकडे कल नसल्याची स्थिती आहे.

Tur Production
Tur Procurement : ‘नाफेड’च्या तूर खरेदीस अल्प प्रतिसाद

उत्पादनात घट

यंदा राज्याच्या विविध भागांत तुरीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर होतो आहे. शेतकरी तूर विक्री करताना गरज पडली तरच तूर विक्रीला प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांना तुरीचे दर दहा हजारांच्या पुढे जातील अशी आशा आहे. दुसरीकडे कापसाचे दर वाढत नसल्याने तुरीच्या ऐवजी कापूस विक्रीला गरज भागविण्यासाठी शेतकरी प्राधान्य देत असल्याचाही परिणाम तूर खरेदीवर होतो आहे. अर्थात, शासनाच्या हस्तक्षेपामुळे दर चढे असल्याचीही चर्चा आहे.

मका खरेदीलाही प्रतिसाद नाही

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी नऊ केंद्र सुरू करण्यात आले या केंद्रावर ३१ जानेवारी अखेरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे. या केंद्रावरून २०८० रुपये प्रतिक्विंटल दराने शासन आधारभूत किमतीने मका खरेदी करणार आहे. प्रत्यक्षात बाजारात २२५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दराने मका खरेदी केली जाते आहे. त्यामुळे शासनाच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची इथेही पाठच दिसते आहे. अर्थात, शासनाच्या हस्तक्षेपामुळे दर चढे असल्याचीही चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com