Cashew  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Market : काजू बीला प्रतिकिलो १३० रुपये दर निश्चित

Cashew Rate : काजू बी दराबाबतचा संभ्रम दूर झाला असून आता प्रतिकिलो १३० रुपये दर मिळणार आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : काजू बी दराबाबतचा संभ्रम दूर झाला असून आता प्रतिकिलो १३० रुपये दर मिळणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा दर निश्चित करण्यात आला आहे.

काजू बी दरावरून गेले चार महिने जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना, काजू उत्पादक आंदोलन करीत होते. प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी काजू बागायतदारांकडून केली जात होती.

अनेक आंदोलने बागायतदारांनी केली, परंतु कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी काजूच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. सध्या बाजारपेठेत काजू बी प्रतिकिलो ११० रुपये सरसकट दिला जात आहे. त्यामुळे काजू बागायतदारांमध्ये नाराजी होती.

दरम्यान, केसरकर यांच्या उपस्थितीत काजू बागायतदार, कारखानदार, व्यापाऱ्यांची सयुंक्त बैठक सावंतवाडी येथे झाली. फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संजय देसाई, आकाश नरसुले यांच्यासह शेकडो बागायतदार उपस्थित होते.

बैठकीत कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी सध्याच्या रक्कमेत पाच रुपये प्रतिकिलो वाढ करण्याचे मान्य केले. याशिवाय शासनाची रक्कम प्रतिकिलो दहा रुपये असा मिळून प्रतिकिलो १२५ ते १३० रुपये दर सरसकट काजू बीला मिळणार आहे.

आयात शुल्काचा मुद्दा देखील बागायतदारांनी मांडला. केसरकर यांनी आचारसंहिता संपल्यानंतर काजू बीवरील आयातशुल्क अडीच टक्क्यावरून १८ टक्के होईल, असे स्पष्ट केले. शासनाने काजू बागायतदारांसाठी जाहीर केलेली रक्कम आचारसंहितेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT