Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : ओल्या कापसाला बाजारात ६४०० ते ६८०० रुपये दर

Cotton Market : शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. अशा कापसाला ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेता पांढरकवडा बाजारात ६८०० रुपयांचा दर मिळाला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : पहिल्या वेचणीतील भिजलेल्या कापसाची साठवणूक केल्यास उर्वरित कापसाची देखील प्रत खराब होण्याची भीती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला आहे. अशा कापसाला ओलाव्याचे प्रमाण लक्षात घेता पांढरकवडा बाजारात ६८०० रुपयांचा दर मिळाला.

मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बोडातील परिपक्‍व झालेल्या कापसाला बसला. बोंडातील कापूस भिजल्याने त्याची प्रतही खालावली. मात्र हाच कापूस घरात साठवत त्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या वेच्यातील कापूस ठेवल्यास एकंदरीत सर्वच कापसाची प्रत खालावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांद्वारे ओलाव्याचे प्रमाण अधिक असतानाही पहिल्या वेच्यातील कापूस बाजारात विक्रीसाठी आणण्यावर भर दिला जात आहे.

खैरगाव देशमुख येथील विलास कोटनाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कापसाला सरासरी ७५२१ रुपयांचा हमीभाव आहे. त्याकरिता एफएक्‍यू दर्जाचा कापूस असावा अशी अट आहे. परंतु मॉन्सूनोत्तर पावसाच्या परिणामी बोंडातील कापूस भिजला. त्यामुळे कापसात सद्यःस्थितीत २० टक्‍के मॉईश्‍चर आहे. २५ एकरांवर कापसाची लागवड आहे.

चार एकरांतील पहिल्या वेच्यापासून १५ क्‍विंटल उत्पादकता मिळाली. आणखी दोन वेचे होतील. त्यातून चार क्‍विंटल आणि दोन क्‍विंटल याप्रमाणे एकरी सरासरी १० ते ११ क्‍विंटलची उत्पादकता अपेक्षित आहे. पहिल्या वेच्यातील कापसाला ६८०० रुपयांचा दर मिळाला. पांढरकवडा येथील स्थानिक व्यापाऱ्यालाच याची विक्री करण्यात आली.

ओला कापूस खाली राहिल्यास त्यानंतर येणाऱ्या वेच्यातील कापूस त्यावर टाकल्यास कापसाची प्रत खालावते. त्यामुळे विक्रीवर भर देण्यात आला.
विलास कोटनाके, खैरगाव देशमुख, यवतमाळ
पांढऱ्या सोन्याचे गाव अशी आमच्या गावाची ओळख. व्यवस्थापनाच्या बळावर आमच्या कापसाची प्रत चांगली राहते. परंतु व्यापाऱ्यांकडून ओलावा अधिक असल्याचे कारणाआड कमी भावाने खरेदी होत आहे. सरासरी १० हजार रुपये प्रति क्‍विंटलचा भाव मिळाला पाहिजे.
रामकृष्ण पाटील, वांजरी, ता. पांढरकवडा, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT