Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Farming: उन्हाचा फटक्यामुळे खाऊच्या पानांची वाढ खुंटली

Climate Change Impact: वाढत्या उष्णतेमुळे खाऊच्या पानांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. फुटवा कमी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, गुढीपाडव्यापासून नव्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्णतेचा फटका नागवेलींना (खाऊच्या पानांना) बसला असल्याने पानांची अपेक्षित वाढ, फुटवा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पानमळे साधले असून, गुढीपाडव्यापासून यंदाचा नवीन पानांचा हंगाम सुरू होणार आहे.

जिल्ह्यातील मिरज पूर्व भागातील आरग, बेडग, नरवाड यासह अन्य भागांतील पान मळ्यांची उतरण पूर्ण झाली आहे. मळ्यांची उतरण केल्याने पानांचे उत्पादन कमी असते. तसेच पानांचा आकारही कमी राहतो. त्यामुळे शेतकरी पानांचा खुडा करत नाहीत. त्यामुळे पानांच्या पेठात पानांची आवक मंदावली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पानमळ्यांना पोषक असे वातावरण होते. परंतु गेल्या पंधरा, वीस दिवसांपासून तापमानात वाढले. वाढत्या उष्णतेचे परिणाम पानमळ्यांवर झाला आहे. वेलीला अपेक्षित फुटवा मिळत नाही. त्यातच पानांचा आकार वाढत नाही. या साऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदाचा पानांचा हंगाम येत्या आठ दिवसांत सुरू होईल. त्या दृष्टीने पान उत्पादक शेतकरी पानांचा खुडा करण्यासाठी नियोजन करू लागले असल्याचे चित्र आहे.

सध्या पानांच्या पेठात चेन्नईतील विजयवाडा, चिन्नूर, कन्नूर या भागातील पाने राज्यातील बाजारपेठेत दाखल होत आहेत. बाजारपेठेत या भागातील पानांची आवक नाही. त्यामुळे विजयवाडा, चिन्नूर, कन्नूर या परिसरातील पानांच्या आवकीत वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कळी पानांच्या डागाला (एक डाग १२ हजार पानांचा) २८०० ते ५००० रुपये असा दर होता. तर फाफडा पानांच्या डागाला २८०० ते ८००० रुपये असा दर आहे.

वाढत्या उष्णतेमुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पानांचा नवीन हंगाम सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर पिकाची परिस्थिती समोर येईल.
भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, ता. मिरज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT