Edible Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Oil Import Duty: सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी सरकारचा खाद्यतेल आयाशुल्कात वाढ करण्याचा विचार; पण सोयाबीन भाव वाढतील का?

Government Policy on Oil: सरकार खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून सोयाबीनचे दर वाढू शकतील. मात्र, यामुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल का? की खाद्यतेल महाग होऊन ग्राहकांवर भार पडेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Anil Jadhao 

Pune News: सोयाबीनचे भाव वाढविण्यासाठी सरकार खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार करत आहे. मंत्री समितीमध्ये याविषयी चर्चा झाल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे. आयात शुल्कात वाढ केल्यानंतर खाद्यतेलाचे दर वाढतील. मात्र वाढलेल्या भावात सोयातेल खाणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव वाढतील का आणि भाव वाढले तरी त्याचा आता किती शेतकऱ्यांना फायदा होईल? हा मूळ प्रश्न आहे. कारण आतापर्यंत बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे.

देशातील तेलबिया पिकांचे भाव वाढावे यासाठी सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये खाद्यतेल आयातशुल्कात २० टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. मात्र त्यानंतरही सोयाबीन आणि मोहरीसह इतर तेलबिया पिकांचे भाव वाढले नाही. त्यामुळे सरकार आता पुन्हा खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार करत आहे, अशी माहीती सरकारी सुत्रांनी दिली. मंत्री समितीमध्ये खाद्यतेल आयात शुल्काविषयी चर्चा झाली. सरकार लवकरच हा निर्णय घेऊ शकते. सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर महागाई देखील वाढेल. सरकारने हा मुद्दाही गृहीत धरला आहे, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

सध्या कच्चे पामतेल, कच्चे सोयातेल आणि कच्चे सूर्यफूल तेल आयातीवर २७.५ टक्के आयात शुल्क आहे. तर रिफाईंड तेलाच्या आयातीवर ३५.७५ टक्के आयात शुल्क आहे. सरकारने सोयाबीन दर डोळ्यापुढे ठेऊन त्यावेळी आयात शुल्कात वाढ केली होती. मात्र आयात शुल्कात वाढ केल्यानंतरही सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा ९०० ते १ हजार रुपयाने कमी आहेत. तर मोहरीचेही भाव हमीभावाच्या खाली आले आहेत. भाव आणखीही कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकार खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा विचार करत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

सोयाबीनचे भाव वाढतील का?

सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी सरकारने सप्टेंबर महिन्यात खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केली. मात्र त्यानंतरही दरात सुधारणा झाली नाही. कारण सोयाबीनचे भाव दबावात राहण्याला तेलाचे भाव नाही तर सोयापेंडच्या भावातील मंदी जबाबदार आहे. देशात डीडीजीएसचा पुरवठा वाढल्याचा परिणाम सोयापेंडच्या भावावर झाला आहे. त्यामुळे सोयाबीन दबावात आले आहे. सोयापेंडचे भाव वाढल्याशिवाय सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे.

खाद्यतेल दरवाढीची भीती

खाद्यतेलाचे भाव मागील ५ महिन्यांमध्ये वाढले. रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतरही दर ५ ते ६ रुपयाने सुधारले आहेत. मात्र सोयाबीनचे भाव वाढले नाहीत. म्हणजेच शेतकरी महाग सोयातेल खात आहेत मात्र सोयाबीनचे भाव वाढले नाहीत. मग आता सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोयातेलाचे भाव तर वाढतील मात्र सोयाबीनचे भाव वाढतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

शेतकऱ्यांना भाव वाढले तरी फायदा किती ?

सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी सरकार आता खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे. पण अजून सरकारने निर्णय जाहीर केला नाही. मार्चमध्ये निर्णय झाला तर त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा होणार ? हा मूळ प्रश्न आहे. कारण आतापर्यंत बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे. त्यातही लहान शेतकऱ्यांनी माल कधीच विकला. त्यामुळे पुढच्या काळात सोयाबीनचे भाव वाढले तरी काही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. पण ज्या शेतकऱ्यांनी कमी भावात सोयाबीन विकले त्यांचे काय? हा प्रश्न कायम राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT