Pomegranate Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Export : डाळिंबाचा पहिला कंटेनर ऑस्ट्रेलियाला रवाना

Team Agrowon

Pune News : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, पणन मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पणन मंडळाच्या वाशी (नवी मुंबई) येथील विकिरण सुविधा केंद्रावरून डाळिंबाची पहिली कन्साईंटमेंट विमानमार्गे मेलबर्न येथे पाठविण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. तर कल्पा खक्कर (पाथर्डी, जि. नगर) यांच्या अनारनेट या ट्रेसेबिलिटी यंत्रणेमध्ये नोंदणीकृत बागेमधून पुरवठा झाल्याचे कदम यांनी सांगितले.

या बाबत कदम म्हणाले, ‘‘जगात भारताचा डाळिंब उत्पादनाचा पहिला क्रमांक लागत असून २०२३-२४ मध्ये ७२ हजार टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. २०१७ मध्ये पणन मंडळाने अमेरिकेचे प्रोटोकॉल तयार करून विविध चाचण्या घेत, अमेरिकेला निर्यात यशस्वी केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियासाठीचे प्रोटोकॉल आणि चाचण्या सुरू होत्या. या चाचण्यांची यशस्वी रिझल्ट आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ही आणखी एक महत्त्वाची बाजारपेठ खुली करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाने २०२० मध्ये भारतातून डाळिंबाच्या निर्यातीसाठी बाजारपेठेत प्रवेश मंजूर केला आहे. भारताने १४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय योजना तांत्रिक बैठकीत ऑस्ट्रेलियाला निर्यात करणाऱ्या डाळिंब फळांसाठी आंतरराष्ट्रीय कार्य योजना आणि मानक कार्यपद्धतीवर स्वाक्षरी केली आहे. या सर्व प्रक्रिया आणि चाचण्या कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या तर अपेडाच्या सहकार्याने के. बी. एक्स्पोर्ट यांनी ही कन्साईंटमेंट पाठविल्याचे निर्यात विभाग प्रमुख सतीश वराडे यांनी सांगितले.

‘फाइन फूड’ प्रदर्शनात होणार मांडणी

महाराष्ट्रातील डाळिंबांची ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या ‘फाइन फूड ऑस्ट्रेलिया’ या प्रदर्शनामध्ये ‘अपेडा’च्या स्टॉलवर सादर करण्यात येणार आहे. हे डाळिंब ग्राहकांना आकर्षित करून भारतीय डाळिंबासाठी ऑस्ट्रेलियन बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संजय कदम आणि के. बी. एक्स्पोर्टचे संचालक कौशल खट्टर यांनी सांगितले. या यशामुळे, इतर निर्यातदार देखील पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरून ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यातीसाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा देखील कदम यांनी व्यक्त केली.

...हे आहेत प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्हे

महाराष्ट्रात सोलापूर, नाशिक, नगर, सांगली, पुणे, सातारा, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. तसेच बुलडाणा, जालना, बीड, औरंगाबाद, जळगांव व धुळे जिल्ह्यांमध्येही क्षेत्र वाढत असून, शेतकऱ्यांना आता पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्राद्वारे निर्यातीसाठी संधी उपलब्ध झाली आहे.

...असे होते पॅकिंग

४ किलोच्या बॉक्समध्ये भरून ३२४ बॉक्सेस १ हजार २९६ किलोवर विकिरण प्रक्रिया करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Farming : स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे पावसाने अतोनात नुकसान

Soybean Cotton Subsidy : अमरावतीतील ५८ हजार शेतकरी लाभाविना राहण्याची शक्यता

Crop Damage : चोवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नांदेडमध्ये नुकसान

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT