Pomegranate Production : गौडवाडीचा डाळिंब उत्पादन पॅटर्न प्रेरणादायी

Pomegranate Farming : प्रतिकूल परिस्थिती असतानाही गौडवाडीसारख्या गावाने डाळिंब शेतीत घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच डाळिंबात गौडवाडीचे नाव झाले.
Pomegranate Production Pattern
Pomegranate Production PatternAgrowon
Published on
Updated on

Solapur News : प्रतिकूल परिस्थिती असतानाही गौडवाडीसारख्या गावाने डाळिंब शेतीत घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच डाळिंबात गौडवाडीचे नाव झाले. डाळिंब उत्पादनाचा इथला पॅटर्न अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे, असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभाग आणि गौडवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शाश्‍वत व निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कार्यशाळा व शिवारफेरी झाली, त्या वेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे,

Pomegranate Production Pattern
Pomegranate Flower Drop : ढगाळ हवामानामुळे डाळिंब बागांत फूलगळ

‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, स्मार्टचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, तहसीलदार संतोष कणसे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. सोमनाथ पोखरे, प्रवीण माने, प्रा. प्रशांत कुंभार, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, गुरुकृपा शेतकरी गटाचे नाना माळी, आण्णा गडदे, कल्लापा गडदे, शिवाजी हिप्परकर आदी उपस्थित होते.

Pomegranate Production Pattern
Telya Disease Pomegranate : शेतकऱ्यांसमोर नवं संकट, डाळिंब बागेत ‘तेल्या’चा धुमाकूळ, सांगलीचे शेतकरी हैराण

या वेळी आशीर्वाद म्हणाले, की जिल्ह्यातील भूजल पातळीचा व उपलब्ध पाण्याचा विचार करता उसासारख्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहिल्यास भविष्यात जल संकट वाढवू शकते, तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या डाळिंबाच्या पर्यायी पिकाकडे वळणे आवश्यक आहे. तसेच गौडवाडी डाळिंब उत्पादनाचा पॅटर्न हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्यासाठी इतर शेतकऱ्यांना ही प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरावा व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे ते म्हणाले.

डॉ. मराठे यांनीही या वेळी निरोगी व सशक्त अशा डाळिंब कलमासाठी प्रमाणित रोपवाटिका स्थापन करणार असल्याचे सांगितले. प्रा. कुंभार, डॉ. धुमाळ, डॉ. पोखरे यांनीही विविध विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. श्रीधर शेजवळ यांनी आभार मानले.

क्रॉपकव्हरच्या अनुदानासाठी प्रयत्न करू

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाळिंब पिकाला आवश्यक क्रॉपकव्हरच्या अनुदानासाठी तसेच बायोगॅसच्या युनिटला अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन या वेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. तसेच डाळिंब निर्यातीमधील अडचणी तसेच डाळिंब भौगोलिक मानांकनाचा वापर या बाबत पाठपुरावा करू, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com