Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनचा सरासरी दर चार हजारांच्या आत

Soybean Market : खामगाव येथील बाजार समितीत विविध भागांतून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे.

Team Agrowon

Buldhana News : खामगाव येथील बाजार समितीत विविध भागांतून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. यात प्रामुख्याने यंदाच्या हंगामातील सोयाबीनही येऊ लागले असून सोयाबीनचा किमान दर ३१०० रुपयांपासून मिळतो आहे. तर कमाल दरही ४५६० रुपयांदरम्यान शुक्रवारी (ता. चार) सोयाबीनला मिळाला. सरासरी ३८३० रुपये दराने अधिक मालाची खरेदी-विक्री झाली.

सोयाबीनच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. येथील बाजार समितीत केवळ तालुक्यातूनच नव्हे तर जिल्हाभरातून विविध गावांतील शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहेत. यामुळे येथे शुक्रवारी साडेसहा हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. सोयाबीनला किमान ३१०० व कमाल ४५६० रुपयांचा दर मिळाला. सोयाबीनची हमीभावापेक्षा बरीच कमी दराने खरेदी होत आहे. सोयाबीन मालात आर्द्रता अधिक असल्याने दर कमी मिळत असल्याचे कारण दिले जात आहे.

सोयाबीनचा नुकताच हंगाम सुरू झाला आहे. दसऱ्यानंतर सार्वत्रिक प्रमाणात सोयाबीनची काढणी सुरू होणार आहे. त्यानंतर बाजारातील आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दर दबावात असल्याने आवक वाढल्यावर दरांची स्थिती काय राहील, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

सततच्या पावसाचा दर्जावर परिणाम

यंदाच्या सोयाबीन हंगामाला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला. सतत पाऊस झाल्याने व सूर्यप्रकाश पुरेसा न मिळाल्याने आधीच सोयाबीनची उत्पादकता पाच क्विंटलच्या आत आलेली आहे. त्यातही मालाचा दर्जाही तितका चांगला नाही. बारीक दाणे अधिक प्रमाणात आहेत. मालातील ओलाव्यामुळे दराला फटका बसतो आहे. बरेच शेतकरी सोयाबीनची काढणी केल्यानंतर सुकवण्याचाही प्रयत्न करीत आहेत. मात्र, तरीही मालात ओलावा राहत आहे. यामुळे व्यापारी दर देताना मागे-पुढे करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT