Nagpur News : कत्तलीनंतर पक्ष्याच्या निरुपयोगी (वेस्ट) अवयवाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील सेंथील नामक युवकाला यश आले आहे. देशातील हा अशाप्रकारचा एकमेव प्रकल्प असल्याची माहिती मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी दिली.
पोल्ट्री क्षेत्रात १० हजार पक्ष्यांपासून सरासरी १२५ किलो वेस्ट, १ लाख लेअर पक्ष्यांपासून १० टन तर १ हजार पक्षी कापले तर ५०० किलो वेस्ट घटक मिळतात असा अभ्यास आहे. पक्ष्यांचे हे निरुपयोगी अवयव सध्या कोठेही फेकले जातात. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारी कोणतीच यंत्रणा देशपातळीवर उपलब्ध नाही.
ही बाब लक्षात घेता कोंबड्यांमध्ये त्यांची पंख, पाय व तोंड अशा भागाला मागणी राहत नाही. परिणामी ते फेकून दिले जातात. पोल्ट्री वेस्टवर प्रक्रिया करुन त्यापासून उपयोगी घटक तयार करणारे तमिळनाडू हे एकमेव राज्य ठरले आहे. सेंथील नामक युवकाने त्याकरिताच प्रकल्प उभारला आहे.
त्याकरिता डंम्पीग ग्राऊंडनजीक अर्धा एकर जागा तेथील प्रशासनाने सेंथील यांना उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी गावभरातील पोल्ट्री वेस्ट आणले जाते. तेथून सेंथील यांच्या कंपनीद्वारे हे वेस्ट उचलत कारखान्यात आणून त्यावर प्रक्रिया होते. सेंथील यांच्या माहितीप्रमाणे पाच टन रोज आणि रविवारी पोल्ट्रीवेस्टचे प्रमाण ३० टन राहते. या वेस्टवर प्रक्रिया करुन त्यापासून तयार ऑईल बायोडिझेल मधे पाच टक्के वापरता येते. त्यासोबचत विशिष्ट पावडर मिळते. या पावडरचा वापर पेट फुड, ऍक्वा फुड यामध्ये होतो, असेही सेंथील यांनी सांगितले.
पेट आणि ऍक्वा फुडमध्ये वापरल्या जाणाऱ्या या पावडरचा दर ३५ रुपये किलो आहे. महिन्याला सरासरी ६८ टन पावडर मिळते. त्यासोबतच मिळणाऱ्या ऑईलचा देखील उपयोग बायोडिझेलमध्ये होत आहे.सेंथील, कोइम्बतूर, तमिळनाडू
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.