Beed News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात एक वेळा चिंचेची १५ क्विंटल आवक झाली. आठवड्यात एकदा आवक झालेल्या या चिंचेला १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक वेळा एक क्विंटल आवक झालेल्या मकाला २००० रुपये क्विंटलचा दर मिळाला. १ ते ५ एप्रिल दरम्यान हरभऱ्याची २०१ क्विंटल आवक झाली. ९ ते १२७ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याला सरासरी ५२४२ ते ५३११ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.
पांढऱ्या तुरीची एकूण १३३ क्विंटल आवक झाली. ८ ते ५४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या तुरीला सरासरी ६७५० ते ७२०७ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मालदांडी ज्वारीची एकूण आवक १४४८ क्विंटल झाली. १४८ ते ३८१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात झालेल्या मालदांडी ज्वारीला सरासरी २४३८ ते २७९८ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.
गव्हाची एकूण आवक ८७० क्विंटल झाली. ४३ ते ३५६ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाला सरासरी २६७८ ते २७९६ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. बाजरीची एकूण आवक २७० क्विंटल झाली.
४२ ते ११९ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी २४०० ते २७७५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. सोयाबीनची एकूण आवक ४८० क्विंटल झाली. ४५ ते १९६ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या सोयाबीनला ४३१८ ते ४५२९ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.