Ethanol Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ethanol Production : इथेनॅालवाढीसाठी उसात गोड ज्वारी घेण्याचे प्रयत्न

Ethanol Supply : इथेनॅालच्या उत्पादनवाढीसाठी केंद्राने गोड ज्वारीची (स्वीट सोरघम) लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Raj Chougule

Kolhapur News : इथेनॅालच्या उत्पादनवाढीसाठी केंद्राने गोड ज्वारीची (स्वीट सोरघम) लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रीय साखर संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. बलरामपूर साखर कारखाना आणि दालमिया भारत शुगर लिमिटेडच्या सहयोगाने गोड ज्वारी आंतरपीक म्हणून घेता येईल का, याबाबत चाचण्या करण्यात येत आहेत.

ऊस लागवड करताना उसाच्या दोन सरींमध्ये ज्वारी घेण्याबाबत चाचपण्या सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहापूर व गोंडा या जिल्ह्यांत हे प्रयोग केले जात आहेत. ऊस व गोड ज्वारीच्या एकत्रित शेतीतून ऊस उत्पादकाला चांगला नफा मिळू शकेल, असा आशावाद केंद्र सरकारला आहे. हा उद्देश पुढे ठेवून हे पथदर्शी प्रयोग केले जात आहेत.

गोड ज्वारीच्या सीएसएच २२, एसएसएसएस ७४, एसएस ८४, फुले वसुंधरा, आयसीएसएसएच २८ या वाणांची चाचपणी इंडियन, इन्सीट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च हैदराबाद यांच्यातर्फे करण्यात आली होती.

या परीक्षणातून या ज्वारीची सरासरी उत्पादन ५० ते ५५ टन प्रतिहेक्टर, तर इथेनॅालचे उत्पादन ४५ ते ५० लिटर प्रतिटन होऊ शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला होता.

दुहेरी पिकामुळे शेतकऱ्याला तर फायदा होईलच पण इथेनॅाल तयार करणारे कारखाने ही ज्वारीही शेतकऱ्यांकडून घेतील. याचा फायदा कारखाने व ऊस उत्पादक दोघांनाही होऊ शकेल.

काय आहे गोड ज्वारी?

गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप ज्वारीसारखीच असते. मात्र जास्त कायिक वाढ आणि तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) असल्याने त्यास गोड ज्वारी म्हणतात. या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. त्याच्या रसापासून काकवी किंवा गूळ आणि इथेनॉल बनविता येते.

गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो. या ज्वारीची लागवड ५५० ते ७५० मिमी वार्षिक पाऊसमानाच्या ठिकाणी करता येऊ शकते. सध्या ही ज्वारी मध्य व दक्षिण भारत, उत्तर प्रदेश व उत्तरांचल आदी ठिकाणी चांगली येऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू

Farmers' Mental Health: मानसिक तणाव, नैराश्यात असणाऱ्यांची संख्या चिंताजनक; शिवार हेल्पलाइनच्या अहवालातून चिंता व्यक्त

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Suspended: ३१ तासांनंतर स्वाभिमानीचे ‘रास्ता रोको’ स्थगित; पुणे-बंगळूर महामार्ग मोकळा

Soybean Price: चंदनखेडा उपबाजारात सोयाबीनला ६४०० रुपये दर

E-Peek Pahani Problems: ई-पीक पाहणीतील अडथळ्यांनी शेतकरी त्रस्त; स्मार्टफोन, सर्व्हर, लोकेशन टॅगिंगच्या अडचणी

SCROLL FOR NEXT