Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : भारतात दहा लाख टनांनी साखरेचे उत्पादन वाढणार

Sugar Market : भारतासाठी जारी केलेल्या ‘शुगर सेमी-वार्षिक’ अहवालात या बाबतची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीच्या अहवालात ३३० ते ३४० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा अंदाज होता.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : सुरुवातीच्या टप्प्यात कमी पावसामुळे देशात उसाच्या लागवडी संकटात आल्या असल्या तरी यंदाच्या पावसाळ्यात मात्र ऊस पिकाला पावसाने चांगला आधार दिला. यामुळे विशेष करून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या आघाडीतील राज्यांतील ऊस उत्पादन पर्यायाने साखर उत्पादनही वाढण्याचा अंदाज अमेरिकेच्या यूएस डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरच्या फॉरेन ॲग्रिकल्चरल सर्व्हिसने वर्तविला आहे. यंदा भारतात ३५० लाख टनांपर्यंत साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज या विभागाने वर्तवला आहे.

भारतासाठी जारी केलेल्या ‘शुगर सेमी-वार्षिक’ अहवालात या बाबतची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीच्या अहवालात ३३० ते ३४० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा अंदाज होता. यंदाच्या हंगामात अनेक साखर उत्पादक राज्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला. एप्रिल, मे मध्ये असलेली दुष्काळाची परिस्थिती जूननंतर बदलून गेली.

पावसात सातत्य राहिल्याने जमिनीत ओलावा कायम राहिला. याचा फायदा उसाच्या वाढीला झाला. आधीच्या अहवालामध्ये पावसाळ्यापूर्वीच्या सहा महिन्यांच्या पर्जन्यमानाचा विचार करून यंदा ऊस पिकाची वाढ उत्तरार्धात ही कमी होईल, असा अंदाज विभागाने वर्तविला होता.

भारताचे साखर उत्पादन ३४० लाख टनांपर्यंत होईल, असे म्हटले होते. पण गेल्या चार महिन्यांत झालेल्या पावसाने हा अंदाज वाढविला आहे. यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे घटलेल्या उसाच्या क्षेत्राचा परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. पाणी साचल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव किंवा पिकांचे नुकसान फारसे झाले नसल्याचे चित्र असल्याने आम्ही हा अंदाज वाढवत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

यंदाच्या हंगामात ऊस लागवड सुमारे एक टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे अनेक ठिकाणी उसाला पुरेसे पाणी मिळाले नाही यामुळे उत्पादनात घट आली. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या हंगामात ही उत्तर कर्नाटक व महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी अल्पमुदतीची कडधान्य पिके घेतली.

पाणी कमी असल्याने ऊस लागवडीही मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. त्यामुळे पुढील हंगामात काहीशी ऊस लागवड घटेल अंदाज ही विभागाचा आहे. पण ही घट केवळ १ ते २ टक्क्यापर्यंत असू शकते, असे विभागाने म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला अपेक्षा

सध्या भारतात सणासुदीचा काळ असल्याने व केंद्राने साखर कोटा ही कमी केल्याने साखरेची दरवाढ चांगली होईल. भारत सरकार यंदाच्या हंगामासाठी साखरेसाठी चांगले निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याने देशातील साखर उद्योगाला याचा फायदा होईल, असे विभागाला वाटते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT