Sugar Industry Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

India Sugar Production: साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घसरले; उतारा केवळ ९.३० टक्के

Sugar Industry: चालू साखर हंगामात देशातील उत्पादन १८ टक्क्यांनी घटून २५७.४० लाख टनांवर पोहोचले आहे. ऊस गाळप कमी, साखर उतारा कमी मिळाल्यामुळे हा घट मुख्य आहे. परंतु २०२५-२६ हंगामात साखर उत्पादन वाढीची अपेक्षा आहे.

Anil Jadhao 

New Delhi News: ऊस गाळप कमी झाले आणि साखर उताराही कमी मिळाला त्यामुळे चालू हंगामात देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले आहे. चालू हंगामातील उत्पादन आतापर्यंत २५७ लाख ४० हजार टनांवर पोचले आहे. तर साखर उतारा केवळ ९.३० टक्के मिळाला. कारखान्यांनी आतापर्यंत ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली, अशी माहीती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली.

ऊस गाळपाच्या १५ मेपर्यंत अहवालानुसार, देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या हंगामात देशातील साखर उत्पादन ३१५ लाख ४० हजार टन होते. मात्र चालू हंगामातील उत्पादन आतापर्यंत २५७ लाख ४० हजार टनांवर पोचले आहे. म्हणजेच आतापर्यंत गेल्या हंगामापेक्षा उत्पादन ५८ लाख टनांनी कमी आहे. चालू हंगामातील उत्पादनात घट येण्याला प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे यंदा उसाची उपलब्धता कमी होती, तर दुसरे म्हणजे साखर उताराही कमी मिळाला, असे  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे. 

गेल्या हंगामात साखर उतारा १०.१० टक्के मिळाला होता. मात्र आतापर्यंत चालू हंगामात ९.३० टक्के साखर उतारा मिळाला. म्हणजेच साखर उताऱ्यात ०.८० टक्के घट आली. याशिवाय उस गाळपही कमी झाले. चालू हंगामात १५ मेपर्यंत २ हजार ७६७ लाख ७५ हजार टन ऊस गाळप झाले. मात्र गेल्या वर्षी ३ हजार १२२ लाख ६१ हजार लाख ऊस गाळप झाले होते. म्हणजेच गेल्यावर्षीपेक्षा ३५४ लाख ८६ हजार टनाने ऊस गाळप कमी आहे, असेही  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.

चालू हंगामाअखेर साखरेचे उत्पादन २६१.१० लाख टन होईल. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस साखरेचा शिल्लक साठा सुमारे ४८ ते ५० लाख टन राहू शकतो, असा अंदाज आहे. उत्पादन कमी झाले तरी देशातील साखरेचा साठा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. तर अनुकूल परिस्थिती तसेच  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागडीमुळे २०२५-२६ च्या हंगामात साखर उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असाही अंदाज  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला.  

राज्यनिहाय साखर उत्पादन 

यंदा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उत्पादनात सर्वाधिक घट आली. महाराष्ट्रातील उत्पादन २९ लाख टनांनी कमी होऊन ८०.९५ लाख टनांवर स्थिरावले. उत्तर प्रदेशातील उत्पादन जवळपास ११ लाख टनांनी घटून ९२.७५ लाख टनांवर आले. कर्नाटकातील साखर उत्पादन ११ टनांनी घटले आणि उत्पादन ४०.४० लाख टनांपर्यंत कमी झाले. तसेच गुजरातमध्ये १०.३० लाख टन उत्पादन झाले. तर उत्तराखंडमध्ये उत्पादनात काहीशी वाढ झाली. तामिळनाडू, बिहार आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्येही साखर उत्पादन कमी राहीले. 

इथेनाॅल उत्पादनाची स्थिती

चालू हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी ३२ लाख साखरेचा वापर होण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण सुरुवातीच्या लक्षापेक्षा थोडा कमी आहे. ही कमतरता उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेसपासून उत्पादीत इथेनॉलच्या किंमतीत सुधारणा न झाल्यामुळे आहे. या परिस्थितीत थेट साखरेपासून निर्मिती अधिक आकर्षक पर्याय बनला आहे. त्यामुळे मोलॅसिसमधील साखर इथेनॉलकडे वळवण्याऐवजी अतिरिक्त ३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

९० टक्के एफआरपी अदा

साखरेचे दर सध्या ३,८८० ते ३,९२० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. यामुळे साखर कारखान्यांनाही पैसा मिळाला. ऊस गाळपापोटी कारखान्यांकडे एकूण १.०१ लाख कोटी रुपयांची एफआरपी देणी होती. त्यापैकी हंगामाच्या केवळ सहा महिन्यांत ९१ हजार कोटी रुपये कारखान्यांनी अदा केले. म्हणजेच ९० टक्के एफआरपी कारखान्यांनी अदा केली, असेही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या मागण्या 

- साखरेच्या किमान विक्री किंमतीत १. ४० रुपये प्रति किलो उत्पादन खर्चाइतकी वाढ करावी.
- २०२५-२६ हंगामात इथेनॉलसाठी ५० लाख टन साखर वळवण्याचे लक्ष्य लवकर जाहीर करावे.
- इथेनॉल खरेदीच्या किमतींमध्ये सुधारणा करावी. विशेषतः उसाच्या रसापासून आणि बी-हेवी मोलॅसेसपासून तयार इथेनॉलचे दर वाढवावे.
- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या बंदरे असलेल्या राज्यांना फायदा व्हावा आणि किंमतीत स्थिरता राखावी यासाठी साखर निर्यात सुरू ठेवावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT