Sugar Industry: द्विस्तरीय साखर दरासाठी शुगर टास्क फोर्स करणार पाठपुरावा

Sugar Task Force Decision: साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याबरोबरच गुजरातमधील साखर उद्योगाच्या उपपदार्थ प्रकल्पांची पाहणी करण्याचा निर्णय शुगर टास्क फोर्सने घेतला आहे.
Sugar
SugarAgrowon
Published on
Updated on

Pune News: साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याबरोबरच गुजरातमधील साखर उद्योगाच्या उपपदार्थ प्रकल्पांची पाहणी करण्याचा निर्णय शुगर टास्क फोर्सने घेतला आहे.

ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर टास्क फोर्सची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. साखर उद्योगातील तज्ज्ञ, कार्यकारी संचालक, शेतकरी नेते, अभ्यासक, शास्त्रज्ञ व ऊस तोडणी कामगार नेते या वेळी उपस्थित होते. श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी टास्क फोर्सच्या कामाचा आढावा घेतला.

Sugar
Sugar Production: साखर उत्पादनात ठरणार उत्तर प्रदेशच अव्वल

टास्क फोर्स कोअर कमिटीचे समन्वयक सतीश देशमुख यांनी, एक हार्वेस्टर किमान दोनशे ऊस तोडणी कामगारांचा रोजगार हिरावून घेत असल्याचे सांगितले. ‘‘एका बाजूला मुकादमाचा ॲडव्हान्स चुकता करायचा व दुसरीकडे सावकाराच्या कर्जाचा तगादा या चक्रात कामगार अडकला आहे. हार्वेस्टर तंत्रज्ञानाला विरोध नाही. मात्र, ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योगातून रोजगार वाढला पाहिजे,’’ असे ते म्हणाले.

ऊस तोडणी मजुरांचे अभ्यासक सोमीनाथ घोळवे यांनी मजुरांचे विविध प्रश्न मांडले. ऊसतोड यंत्र उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी महेश सूळ यांनी यांत्रिकीकरणाचे फायदे व तोटे सांगितले. कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. दीपक गायकवाड यांनी मध्यस्थ कमी करण्याची सूचना केली. ऊसतोड कामगार व मुकादम युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी यंत्रांद्वारे ऊस तोडणीचा पर्याय स्वीकारण्यास संमती दर्शविली. शेतकरी प्रतिनिधी रावसाहेब ऐतवडे यांनी ऊसतोडणी यंत्रामधील त्रुटींची माहिती दिली.

Sugar
Sugar Production: देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले

‘आंदोलन अंकुश’चे दीपक पाटील यांनी, ऊस तोडणी व वाहतूक वजावटीमध्ये जास्त वाढ झाली आहे. त्याची आकारणी सरासरीप्रमाणे न करता अंतरानुसार टप्पानिहाय करण्यात यावी, अशी मागणी केली.

चर्चेत कार्यकारी संचालक तात्यासाहेब निकम, इन्स्टिट्यूट ऑफ शुगर टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील, माजी कार्यकारी संचालक अनंत निकम, नंदकुमार सुतार, ‘डीएसटीए’चे डॉ. दशरथ ठवाळ, सरव्यवस्थापक रोहिदास यादव व भारत तावरे, नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव खामकर, शेतकरी अभ्यासक सीमा नरोडे, कारखाना कर्मचारी प्रतिनिधी दिलीप वारे, बाळ भिंगारकर, राहुल माने, संतोष पांगरकर, सुनील साळवे यांनीही भाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com