
Kolhapur News : गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा इथेनॉल कंपन्यांना मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलचा सर्वाधिक पुरवठा होत आहे. यंदा फेब्रुवारीअखेर मक्यापासून तयार झालेल्या ११९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. या कालावधीत विविध घटकांपासून तयार झालेल्या २७८ कोटी लिटरचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला आहे. यापैकी ११९ कोटींचा वाटा मक्याचा आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत उसाचा रस, साखरेच्या सिरपपासून ११६ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना वितरित करण्यात आलेले आहे. बी हेवी मोलॅसिसपासून २१ कोटी, खराब धान्यापासून १८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. अनुदानित तांदळापासून अजूनही इथेनॉलची निर्मिती झाली नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षीपासून मक्याच्या लागवडीला केंद्राने प्रोत्साहन दिले. सध्या एकूण मागणीच्या तुलनेत मक्याचे पीक फारसे नाही. स्टार्च व पशुखाद्य उद्योगासाठी ही मक्याला नियमित मागणी असते. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत केंद्राने मक्याच्या वापराला प्राधान्य दिल्यानंतर मक्याला इथेनॉल उद्योगातून मागणी वाढू लागली.
२०२१-२२ पर्यंत तेल कंपन्यांना मक्यापासून तयार झालेले इथेनॉल मिळत नव्हते. सगळा भार साखर उद्योगावर होता. २०२२-२३ ला ३१ कोटी, तर २०२३-२४ ला तब्बल २८६ कोटी लिटर मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलचा पुरवठा तेल कंपन्यांना मक्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांकडून झाला. यंदाही मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉल वाढविण्यासाठी मका लागवडीला केंद्र शासन प्राधान्य देत आहे.
गेल्या वर्षी (२०२३-२४) बी हेवी मोलॅसिसपासून १४८ कोटी, ऊस रस साखरेच्या पाकापासून ६३ कोटी, सी हेवी मोलॅसिसपासून ५४ कोटी लिटर मोलॅसिसची निर्मिती झाली. प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास मक्यापासून सर्वाधिक २८६ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना देण्यात आले.
गेल्या पाच वर्षांतील घटकानुसार झालेला इथेनॉलचा पुरवठा असा (कोटी लिटर)
वर्ष* सी हेवी मोलॅसिस *बी हेवी मोलॅसिस *साखर ज्यूस सिरप* खराब धान्य* मका *अनुदानित तांदूळ
२०१९-२०---७४.१२---६८.१४---१४.८३---१५९४.---०---०
२०२०-२१---३८.९०---१८३---३९.००---३९.३०---०---२.२०
२०२१-२२---१०.६---२४९---८०.२६---२२.५९---०---४५.७५
२०२२-२३---५.६०---२३५---१२८.४०---३१.९०---३१.५०---७३.७०
२०२३-२४---५७.६६---१४८---६३.९०---११५.६---२८६.४७---०.१३
२०२४-२५---२.६३---२१.६९---११६---१८.९५---११९---०
(फेब्रुवारीअखेर) एकूण---१७३.०३---३०२.४०---४०८.०९---५०६.४०---६७२.४९---२७८.८८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.