Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production : साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ लाख टनांनी घटले

Sugar Market : देशात नोव्हेंबर अखेर ४३ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ५ लाख टनाने साखरनिर्मिती कमी झाली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशात नोव्हेंबर अखेर ४३ लाख टन साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ५ लाख टनाने साखरनिर्मिती कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र व कर्नाटकातील कमी साखर उत्पादनामुळे देशातील साखर उत्पादन पिछाडले.

देशात सुरू असणारे कारखाने, उसाचे गाळप, साखर उत्‍पादन, साखर उतारा, या सर्वच बाबी गेल्‍या वर्षीपेक्षा कमी आहेत. यंदा देशात ४३३ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. गेल्‍या वेळी ४५१ साखर काऱखान्यांनी हंगाम सुरू केला होता.

देशाचा यंदाचा साखर हंगाम ऑक्टोबरला सुरू झाला. या महिन्यात केवळ उत्‍तर प्रदेशातील साखर कारखाने सुरू झाले. महाराष्ट्र व कर्नाटकचा हंगाम नोव्हेंबरला सुरू झाला. महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असल्‍याने महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साखरनिर्मिती सुरू झाली.

या कालावधीत केवळ उत्तर प्रदेशातच साखरनिर्मिती सुरू राहिली. सुरुवातीला उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली. परंतु नोव्‍हेंबरच्‍या उत्तरार्धापासून महाराष्ट्रातही वेगात हंगाम सुरू झाल्‍याने या राज्याचे उत्पादनही वाढले.

उत्तर प्रदेशात ११० साखर कारखान्यांनी १४४ लाख टन ऊस गाळप करून १३ लाख टन साखर तयार केली आहे. या राज्‍यांत गेल्‍या वर्षीपेक्षा अधिक ६ साखर कारखाने सुरू झाले. गेल्‍या वर्षी या कालावधीत १० लाख टन साखर तयार झाली होती. महाराष्ट्रात १७२ साखर कारखान्यांनी १७१ लाख टन उसाचे गाळप केले. १३.५० लाख टन साखर तयार केली. महाराष्ट्र केवळ ५० हजार टनांनी साखर निर्मितीत पुढे आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या राज्यात तब्बल ७ लाख टनांनी साखर उत्पादन घटल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचा साखर उताराही गेल्या वर्षीच्या तुलनेत १ टक्क्याने घटला आहे. कर्नाटकात ७३ कारखान्यांनी साखर हंगाम सुरू केला. कर्नाटकात १२९ लाख उसाचे गाळप होऊन ११ लाख टन साखर तयार झाली.

तीन राज्यांचे गाळप ८६ टक्के

देशातील साखर निर्मितीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या पहिल्‍या तीन राज्‍यांनी एकूण गाळपाच्या ८६ टक्के गाळप केले. तर ८७ टक्के साखरेचे उत्पादन केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखाने सुरू होण्याची टक्केवारी ४ टक्क्यांनी कमी आहे. गाळप १० टक्क्यांनी घटले आहे. साखर उत्‍पादनही ११ टक्क्यांनी कमी आहे. साखर उताऱ्‍यातही ०.२५ टक्क्यांची घट आहे. उत्तर प्रदेश व कर्नाटकचा साखर उतारा महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT