Sugar Production : ‘बळीराजा’चे १ लाख ५३ हजार क्विंटल साखर उत्पादन

Sugarcane Crushing : कान्हडखेड (ता. पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखान्याने यंदाच्या (२०२३-२४) गाळप हंगामात मागील ४२ दिवसांत गुरुवार (ता. १४)पर्यंत १ लाख ६४ हजार २० टन उसाचे गाळप केले आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : कान्हडखेड (ता. पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखान्याने यंदाच्या (२०२३-२४) गाळप हंगामात मागील ४२ दिवसांत गुरुवार (ता. १४)पर्यंत १ लाख ६४ हजार २० टन उसाचे गाळप केले असून, १०.३२ टक्के उताऱ्याने १ लाख ५३ हजार ६०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी दिली.

बळीराजा साखर कारखान्याच्या सभागृहात देणं समाजाच परिवाराच्या वतीने अध्यक्ष जाधव व कार्यकारी संचालक अजय जाधव यांचा सत्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दत्तात्रेय वाघमारे यांच्या हस्ते व डॉ. गुलाबराव इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

Sugar Factory
Sugar Smuggling : भारत-बांगलादेश सीमेवर साखरेची तस्करी रोखली : १२० क्विंटल साखर जप्‍त

या वेळी जाधव म्हणाले, की या वर्षीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत पहिली उचल प्रति टन २ हजार २०० याप्रमाणे ११ कोटी ५० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. या वर्षी ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिली उचल प्रति टन २ हजार २०० रुपये देण्यात येत असून, त्यानंतर दुसरी उचल पेरणीपूर्व व त्यानंतर तिसरी उचल दिवाळी सणाला या प्रमाणे एफआरपीनुसार दिली जाणार आहे.

Sugar Factory
Bidri Sugar Factory : ऊस दरात राज्यात बिद्री सहकारी साखर कारखाना लै भारी, दिला उच्चांकी दर

कारखान्याच्या नियमाप्रमाणे सभासदांच्या उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतर बिगर सभासद व परिसरातील शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊसगाळप केला जाईल. यासाठी वाहतूक तोडणी यंत्रणा सज्ज असून सक्षमपणे काम करत आहे.

शेतकऱ्यांनी या वर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा जास्तीत जास्त उतारा देणाऱ्या उसाच्या जातीची लागवड करावी, असे आवाहन जाधव यांनी केले. या वेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर आप्पा जाधव, सरव्यवस्थापक भगवान मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चीफ केमिस्ट किरण मगर, मुख्य शेती अधिकारी रमेश पौळ, नितीन गोणारकर, मदन देशमुख, विनायक कराळे, रामजी शिंदे, विनायक कदम, गणेश सूर्यवंशी आदी अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com