Sugar Export  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export : राज्यातील साखर उत्पादनात १६ टक्के घट; अतिरिक्त साखर निर्यातीची शक्यता मावळली?

हंगाम सुरू झाला तेव्हा यंदा विक्रमी साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी मिळावी, यासाठी साखर उद्योगाकडून लॉबिंग सुरू होते

Team Agrowon

राज्यातील साखर उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा १६ टक्के घट होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा ऊस कमी उपलब्ध झाल्यामुळे साखर कारखान्यांनी गाळप हंगाम लवकर आटोपता घेतला, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली.

यंदा देशात साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार असल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त साखर निर्यातीची शक्यता जवळपास मावळली आहे.

भारत हा ब्राझीलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातीदार देश आहे. गेल्या हंगामात भारताने विक्रमी ११० लाख टन साखर निर्यात केली होती.

परंतु एक ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात मात्र केंद्र सरकारने केवळ ६१.५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली.

हंगाम सुरू झाला तेव्हा यंदा विक्रमी साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी मिळावी, यासाठी साखर उद्योगाकडून लॉबिंग सुरू होते.

``यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात १०७ ते १०८ लाख टन साखर उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. आधीचा अंदाज १२८ लाख टन उत्पादनाचा होता,`` असे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले. गेल्या हंगामात १३७ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

गेल्या वर्षी राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे साखर कारखाने जूनच्या मध्यापर्यंत सुरू होते. यंदा मात्र कारखान्यांची धुराडी लवकर बंद होत आहेत.

`` कारखाने झपाट्याने बंद होत आहेत. बहुतेक सगळे कारखाने या महिन्याच्या अखेरीस गाळप बंद करतील. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कारखाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालू राहतील,`` गायकवाड म्हणाले.

यंदाच्या हंगामात राज्यातील २१० पैकी १५५ कारखान्यांनी २६ मार्चला गाळप थांबवले आहे. या काळात सुमारे १०४ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी २६ मार्चपर्यंत ११६ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात साखर उत्पादन घटल्यामुळे आता अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी दिली जाणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात साखर उद्योगाने उपलब्ध ऊस क्षेत्र व समाधानकारक पावसाचा हवाला देत जादा साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता.

त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त २० लाख टन साखर निर्यातीला परवानगी मिळावी, यासाठी साखर उद्योगाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते.

परंतु जानेवारीनंतर मात्र साखर उत्पादन घटण्याची चिन्हे दिसू लागली. परिणामी अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने सावध भूमिका घेतली.

भारतातून अपेक्षेपेक्षा कमी साखर निर्यात होणार असल्यामुळे ब्राझील आणि थायलंड या स्पर्धक देशांचा फायदा होणार आहे. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये साखर निर्यात करत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT