Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market: सोयाबीन वर्षभरात ४० टक्के पडलं; पुढचे भविष्य काय ? अमेरिकेत यंदा उत्पादनवाढीच्या अंदाजाने बाजारावर दबाव

Soybean Update : गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भाव चार वर्षातील सर्वात कमी आहे.

Anil Jadhao 

Pune News : गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भाव चार वर्षातील सर्वात कमी आहे. अमेरिकेचे सोयाबीन पुढच्या महिन्यात बाजारात येईल तर भारताचे ऑक्टोबरमध्ये. अमेरिकेचा नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर सोयाबीनचे भाव ४ वर्षातील निचांकी पातळीवर जाण्याला महत्वाची तीन कारणं आहेत. 

सोयाबीनचा बाजार ४ वर्षातील निचांकी पातळीवर येण्याला तीन कारण आहेत. त्यात पहीलं कारण आहे अमेरिकेतील उत्पादनवाढीचा अंदाज. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील सोयाबीन पुढच्या महिन्यात बाजारात येईल. यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. शेतकरी मागील हंगामातील सोयाबीन विक्री करत आहेत. त्यामुळे बाजारात उत्पादन वाढीचे सेंटीमेंट तयार झाले असून बाजारात विक्री वाढली. शेतकरीही सोयाबीन विकत असल्याने दरावर दबाव आला. सोयाबीन ऑगस्ट २०२० च्या पातळीवर पोचले आहे. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे काल ९.९३ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या निचांकी पातळीवर पोचले होते. आज त्यात पुन्हा काहीशी सुधारणा होऊन वायदे १० डाॅलरच्या पातळीवर पोचले होते. 

दुसरं कारण म्हणजे कमी झालेली मागणी. अमेरिकेत उत्पादन वाढीच्या अंदाजानंतर सोयाबीनची विक्री वाढली होती. पण दुसरीकडे मागणी कमी झाली. बाजारातील विक्री वाढल्याचा हा दबाव दरावर आला. तिसरं कारण म्हणजे बाजारात तयार झालेलं सेंटीमेंट. उत्पादनवाढीच्या अंदाजामुळे बाजारात मंदीचे सेंटीमेंट तयार झाले. सोयाबीन बाजारातील मंदी वाढत जाईल, या सेंटीमेंटचा परिणाम बाजारावर वाढत गेला. 

सध्या उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने बाजारावर दबाव आहे. पण ऑगस्ट महिना अमेरिकेच्या सोयाबीन पिकासाठी महत्वाचा असतो. अमेरिकेत सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मागील आठवड्यातही काही भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा परिणाम पिकावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा काहीसा आधार बाजाराला मिळतोय. तसेच पुढील काही दिवस अमेरिकेच्या बहुतांशी भागात कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे.

सप्टेंबरमध्येही हवामान कसे राहील त्याचा फार मोठा परिणाम अमरिकेच्या पिकावर होणार आहे. त्यामुळे या दोन ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये हवामान कसे राहील? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सोमवारी युएसडीचा ऑगस्ट महिन्याचा अहवाल येणार आहे. त्याकडेही बाजाराचे लक्ष आहेच. या अहवालात अमेरिकेच्या उत्पादनाच्या अंदाजात जरासा बदल केला तरी बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील बाजारावर परिणाम होत आहे. नव्या हंगामातील उत्पादन किती राहील? हे पुढच्या दोन महिन्यातील पाऊसमान आणि काढणीच्या काळात वातावरण कसे राहते? यावर अवलंबून असेल. सध्या वाढलेली लागवड आणि अनेक भागात पुरेसा पाऊस यामुळे उत्पादन वाढीचे अंदाज आहेत. सध्या उत्पादन वाढीचे अंदाज असले तरी प्रत्यक्ष काढणीच्या काळात किती उत्पादन हाती येईल? यावर बाजाराची दिशा ठरेल. मात्र सध्या तरी वातावरण मंदीच्या बाजुने दिसते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT