Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

Seed Shortage Issue: खानदेशात यंदा सोयाबीन पेरणीस मोठा प्रतिसाद मिळाल्याने बियाण्याची मागणी वाढली. मात्र दर्जेदार बियाण्याचा तुटवडा आणि काळाबाजारामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात सोयाबीनची पेरणी किंचित वाढली आहे. या स्थितीत बियाण्याची मागणी देखील वाढली. किमान ३२ हजार क्विंटल बियाण्याची विक्री यंदा खानदेशात झाली आहे, परंतु दर्जेदार, उगवणक्षम वाण पुरवठ्याचे आव्हान कृषी विभागासमोर होते. त्याची टंचाई व तुटवडा यामुळे काळाबाजारही झाला. यात खासगी कंपन्या, पुरवठादार मालामाल झाल्याची स्थिती आहे. कारण अनेकांनी सोयाबीन पेरणीस पसंती दिली.

यंदा खरिपाला सुरुवात होताच सोयाबीनच्या काही वाणांची टंचाई तयार झाली. ही टंचाई वाढल्याने काळाबाजार व दरांबाबतही विविध आरोप शेतकरी करीत होते. कृत्रिम टंचाई तयार करून बियाणे पुरेसे देण्यात आले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी केंद्रचालक बियाणे पुरवठाच हवा तेवढा नसल्याने आमची अडचण आहे, असे सांगत होते.

यंदा सोयाबीन बियाण्याची दरवाढ झाली. ३० किलो बियाणे ३२०० ते ३४०० रुपयात दिले जात होते. काही कंपन्यांचे बियाणे यापेक्षा कमी दरात देण्यात आले. महाबीजचे बियाणेदेखील यंदा महाग होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ३० किलो बियाण्यासाठी २८००, ३४००, असे वेगवेगळे दर विविध कंपन्यांनी निश्‍चित केले होते. परंतु यंदा खानदेशात कापसाऐवजी सोयाबीनला पसंती मिळाली

सोयाबीनची पेरणी खानदेशात जळगावमधील जळगाव, चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील शहादा भागात झाली आहे. धुळे, नंदुरबारात पेरणी कमी आहे.

कृषी विभाग बघ्याच्या भूमिकेत

वाणांचा तुटवडा व काळाबाजार याबाबत कृषी विभागानेही यंदा नेहमीप्रमाणे हात राखून कारवाई केली. कुठेही मोठी कारवाई झाली नाही. जुजबी कारवाई करून विषय संपविण्यात आले व काही वितरकांना पाठीशी घालण्यात आले, असाही आरोप शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

Solar Power: सांगली, कोल्हापुरात ‘सौर कृषिवाहिनी’ योजनेला गती द्या; लोकेश चंद्र

Monsoon Rain: आज, उद्या राज्यात पावसाची शक्यता; विदर्भात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT