Fertilizers Market : अमरावती जिल्ह्यात अनुदानित खतांचा काळाबाजार

Fertilizers Black Market in Amravati : नांदगावपेठ हद्दीत वडगाव माहुरे शेतशिवारात निर्जनस्थळी १६ चाकांच्या संबंधित ट्रकमधून खतांची पोती खाली उतरवून दुसऱ्या पोत्यात खत भरत असताना तिघे जण व काही मजूर संशयास्पद स्थितीत हालचाली करताना आढळले.
Fertilizer supply
Fertilizer supply Agrowon
Published on
Updated on

Amravati News: अनुदानावरील खतांचा काळाबाजार सुरू असताना गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने नांदगावपेठ परिसरात छापा टाकत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख २१ हजार ६०१ रुपयांचा खतसाठ्यासह एमएच २७ बीक्यू ९७८६ क्रमांकाचा ट्रक, एक इलेक्ट्रिक शिलाई मशीन, वजनकाटा असा एकूण ३० लाख ४६ हजार ६०१ रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संजय रमेशचंद्र अग्रवाल (वय ५४, आर्वी, जि. वर्धा), अशोक धनराज रावलानी (वय ५४, रा. कृष्णानगर, अमरावती) व ट्रकचालक दिनेशकुमार छबराज यादव (वय ४५, रा. रमबीयालगंज, जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक तिघांची नावे असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी दिली.

अटक तिघांविरुद्ध नांदगावपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अमरावती न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रवीण विजय खर्चे (वय ४५) यांच्या तक्रारीवरून नांदगावपेठ ठाण्यात रविवारी (ता. १३) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगावपेठ हद्दीत वडगाव माहुरे शेतशिवारात निर्जनस्थळी १६ चाकांच्या संबंधित ट्रकमधून खतांची पोती खाली उतरवून दुसऱ्या पोत्यात खत भरत असताना तिघे जण व काही मजूर संशयास्पद स्थितीत हालचाली करताना आढळले.

Fertilizer supply
Urea Black Market : अनुदानित युरियातील काळाबाजार उघडकीस

पिवळ्या रंगाचे खताचे भारतीय जन उर्वरक परियोजना भारत युरिया असे लिहिलेले पोते उतरवून, पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरल्या जात होते. त्यावर टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रिअल यूज ओण्ली असे लिहिलेले होते.

त्याचे वजन काट्यावर वजन करून मशीनद्वारे रिसील केल्या जात होते. गुन्हेशाखा युनिट एकच्या पोलिसांनी संबंधितांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे दस्तऐवज आढळले नाही. त्यामुळे गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन खात्री करून घेतली. त्यानंतर कृषी विभागाने नांदगावपेठ पोलिसांत तक्रार दिली.

अटकेतील संजय अग्रवाल याचे आर्वीत कृषी सेवा केंद्र आहे. त्यानेच हा माल जालना जिल्ह्यातील सिल्लोड, भारवाडी येथून सदर ट्रकमध्ये नांदगापेठपर्यंत आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.

- गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक, गुन्हेशाखा, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com