Soybean Rate : माजलगाव बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ४३०० ते ४५०१ रुपयांचा दर

Soybean Market : माजलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची कमीत कमी दर ३७५० रुपये तर जास्तीत जास्त दर ४,६१९ रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहिले.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Beed News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सोयाबीनचे एकूण १६२८ क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला सरासरी ४३०० ते ४५०१ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

माजलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनची कमीत कमी दर ३७५० रुपये तर जास्तीत जास्त दर ४,६१९ रुपये प्रति क्विंटलपर्यंत राहिले. सोयाबीनची आवक १४७ ते ८८० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झाली. बाजरीची एकूण आवक ७३९ क्विंटल झाली.

Soybean
Soybean Sowing : सोयाबीनची ५ लाख ३६ हजार हेक्टरवर पेरणी

आठवडाभरात ७२ ते ३०२ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या बाजरीला सरासरी २५०० ते २६५१ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. हरभऱ्याची एकूण आवक ४३३ क्विंटल झाली. ३ ते १५५ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हरभऱ्याची सरासरी दर ६००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटलला दरम्यान राहिले.

Soybean
Tur Import Duty: तुरीवरील आयात शुल्कात शंभर टक्के वाढ करावी

पांढऱ्या तुरीची एकूण आवक ५१० क्विंटल झाली. ६० ते १४५ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या पांढऱ्या पोरीला ६ हजार ४०० ते ६ हजार ४७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

रब्बी ज्वारीची एकूण आवक ७१४ क्विंटल झाली. ३७ ते ३२० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या रब्बी ज्वारीला २४०० ते २४५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

गव्हाची एकूण आवक ४५१ क्विंटल झाली. ३४ ते २०१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या गव्हाला सरासरी २६०० ते २६७५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. उडदाची एक वेळा ४ क्विंटल आवक झाली.

या उडीदाला ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मुगाची एक वेळा १ क्विंटल आवक झाली.या मुगाला ६००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com