Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : ओलाव्याच्या कारणाआड सोयाबीन दर दबावात

Soybean Rate : केंद्र शासनाने सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला असतानाच बाजारात मात्र सोयाबीन ३२०० ते ४२०० रुपये दराने विकले जात आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : केंद्र शासनाने सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला असतानाच बाजारात मात्र सोयाबीन ३२०० ते ४२०० रुपये दराने विकले जात आहे. बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक होत असून त्यात ओलावा १८ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने हे दर मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

बाजारात सोयाबीन ३२०० ते ४००० रुपयांनी विकले जात असल्याच्या परिणामी केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात वाढ केली. त्याच्या परिणामी सोयाबीनचे दर तेजीत येतील, अशी अपेक्षा होती. परंतु सोयाबीन दराऐवजी खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली.

त्यामुळे आता सोया पेंडच्या दरात वाढीसाठी निर्यात अनुदान देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोया पेंडचा वापर पोल्ट्री फिडमध्ये होते. सोया पेंडला निर्यात अनुदान दिल्यास निर्यात वाढेल. मात्र त्याचा विपरित परिणाम पोल्ट्री फिडच्या दरावर होणार असल्याची भीती पोल्ट्री उद्योगातून व्यक्‍त केली जात आहे.

ही सारी स्थिती असताना सोयाबीनचे दर मात्र वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. एकट्या अमरावती बाजार समितीत रोज सरासरी २० हजार क्‍विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक होत आहे. परंतु या शेतीमालात ओलाव्याचे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगत ३८०० ते ४२०० रुपये अशा दराने सोयाबीन खरेदी केले जात आहे.

मध्य प्रदेशात दर ३००० रुपयांवर

ओलाव्याचे कारण देत सोयाबीनचे देशातील पहिल्या क्रमांकाचे उत्पादक राज्य असलेल्या मध्य प्रदेशात अवघ्या ३००० ते ४६३० रुपये दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. विदिशा (मध्य प्रदेश) बाजार समितीत एक हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून दररोज सरासरी ११ हजार क्‍विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

२ टक्‍के माती, २ टक्‍के डॅमेज आणि १२ टक्‍के ओलावा असे सोयाबीनची हमीभाव खरेदीकरीता निकष आहेत. परंतु सध्या ६० टक्‍के आवक होणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दर हमीभावाइतका मिळू शकत नाही. याची दखल घेत शासनाने भावांतर योजना राबवित सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे.
- बालाजी ढोबे, संचालक, कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वरोरा, चंद्रपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT