Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन दर ५००० रुपयांवर स्थिरावण्याची शक्यता

बाजारात सोयाबीनची आवक यंदा लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उत्पादकांसह साठवणूकदारांनी त्यांच्याकडील शिल्लक साठा विक्रीसाठी बाहेर काढला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) यंदा लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उत्पादकांसह साठवणूकदारांनी त्यांच्याकडील शिल्लक साठा (Soybean Buffer Stock) विक्रीसाठी बाहेर काढला आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन दर (Soybean Rate) ५००० रुपयांवर स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (Soybean Processors Association Of India) माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत २७ लाख टन पेक्षा अधिक साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.

नव्या सोयाबीनची आवक राज्याच्या अनेक भागात झाली आहे. देशात मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हे तीन प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून ओळखले जातात. नव्या सोयाबीनची आवक आणि शिल्लक साठा यामुळे उत्पादक आणि साठवणूकदार हे दोघेही प्रक्रिया उद्योगांना मालाचा पुरवठा करण्याची घाई करीत आहेत. याच कारणामुळे राजस्थानातील प्रक्रिया उद्योगांना पुरवठा होणाऱ्या मालाच्या दरात १०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल इतकी घट झाली आहे.

मध्यप्रदेशातील बैतूल, भोपाळ, दतिया आणि देवास या भागांत दर २०० ते २५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. ५००० ते ५४०० रुपये क्विंटलने या भागात सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. इंदूरमध्ये देखील प्रक्रिया उद्योगांना पुरवठा होणाऱ्या सोयाबीनचा बाजार नरम होता. तरी सुद्धा दर ५००० रुपयांवर होते.

महाराष्ट्रात देखील दरात ३०० रुपयांची घट अनुभवण्यात आली. काही ठिकाणी ती १०० ते १२५ रुपये होती. सांगलीतील एका उद्योगाला पुरवठा होणाऱ्या सोयाबीन दरात सर्वाधिक ३७५ रुपये प्रति क्विंटलची घट होती. ५१२५ ते ५६०० रुपये असा दर महाराष्ट्रात आहे. राजस्थानच्या कोटामधील दोन उद्योगांना पुरवठा होणाऱ्या सोयाबीनच्या दरात १००-१०० रुपये घट आली. या भागात सोयाबीन उद्योगांची कच्च्या मालाची मागणी कमी झाली आहे.

सोया ढेप, सोयाबीन आयातीचा परिणाम

नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीन आवक सुरुवातीला अवघी १०० क्विंटलपर्यंत होती. त्यानंतर त्यात वाढ होत आता ती ५०० क्विंटलवर पोचली आहे. ४२५० ते ५०७५ रुपयांनी सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. हमीभाव ४३०० रुपयांच्या आसपास आहेत. यंदा सोयाबीन दर तेजीत राहण्याची शक्यता होती. परंतु सोया ढेप व सोयाबीन आयातीमुळे दर हमीभावाच्या आसपास राहिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार

NCCF Branch Manager Transfer: ‘एनसीसीएफ’च्या शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली

CCI Cotton Procurement: कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी

Maharashtra Rain: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Nashik Heavy Rain : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT