Soybean Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : खानदेशात सोयाबीनला ४४०० ते ४६५० रुपयांचा दर

Soybean Rate : खानदेशात मागील तीन-चार दिवसांत सोयाबीनच्या आवकेत काहीशी वाढ झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मागील तीन-चार दिवसांत सोयाबीनच्या आवकेत काहीशी वाढ झाली आहे. विविध बाजार समित्यांत दर ४४०० ते ४६५० रुपये व सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. हमीभावाएवढा दर मात्र अल्प शेतकऱ्यांना विविध बाजार समित्यांत मिळाला. दरात किंचित वाढही मागील काही दिवसांत झाली आहे.

मध्यंतरी अनेक बाजार समित्यांत किमान दर ४१०० ते ४२५०, ४३०० रुपये प्रतिक्विंटल असे नोंदविण्यात आले. परंतु जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील नंदुरबार, शहादा या बाजार समित्यांत किमान दर मागील तीन दिवस ४२०० रुपयांवरच राहिले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोयाबीनची चोपडा बाजार समितीत मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ५० क्विंटल आवक झाली. जळगाव येथील बाजार समितीतही मागील पाच दिवस प्रतिदिन सरासरी २५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. अमळनेर, शिरपूर, शहादा येथेही आवक मागील तीन-चार दिवसांत सतत वाढली आहे. दर्जेदार सोयाबीनची आवक सध्या होत आहे.

कारण मागील २० ते २२ दिवस अपवाद वगळता कुठेही जोरदार, मध्यम पाऊस झाला नाही. परिणामी सोयाबीनचा दर्जा टिकून राहिला. तसेच कोरड्या वातावरणात त्याची वाळवणूकही व्यवस्थित झाली. त्यात आर्द्रताही अल्प आहे. अनेक शेतकरी मळणीनंतर त्यास वाळवून घेत असून, लागलीच बाजारात विक्री करीत आहेत.

स्वच्छ केलेल्या टपोऱ्या दाण्यांच्या सोयाबीनचा दर चोपडा बाजार समितीत ४६०० रुपये प्रतिक्विंटल होता. खानदेशात सोयाबीनचे बऱ्यापैकी उत्पादन यंदा मिळाले आहे. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन साध्य होत असून, दरही मागील काही दिवस टिकून आहेत. यामुळे त्याची बाजारातील आवक वाढली आहे, असा मुद्दा जाणकारांनी उपस्थित केला. पुढेही आवक कायम राहील. दरात मात्र मोठी वाढ होणार नाही, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: राज्यात नुकसानीपोटी ३३७ कोटींची मदत

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Group Farming : स्थलांतराला गटशेतीचा पर्याय

Farm Road Registration : महिला शेतकऱ्याला शेत रस्ता नोंदीचा पहिला सातबारा

Agriculture Irrigation : शेती सिंचनासाठी विशेष अभियान

SCROLL FOR NEXT