Soybean Rate
Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन उत्पादकता वाढली

टीम ॲग्रोवन

वाशीम ः गेल्या काही वर्षांत सोयाबीनचे आगार (Soybean Hub) म्हणून ओळख तयार झालेल्या वाशीम जिल्ह्यात हे पीक उत्पादन (Soybean Production) वाढीसाठी विविध प्रकारचे प्रयत्न होत आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या उत्पादकतेवर (Soybean Productivity) दिसून आला आहे. कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान(गळीतधान्य) (National Food Security Mission) व राज्य पुरस्कृत गळीत धान्य सोयाबीन पीक प्रात्यक्षिक योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या आकडेवारीतून उत्पादकता वाढीचा दावा केला जात आहे.

जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ३२ गावांमध्ये ३२०० हेक्टरवर हे प्रात्यक्षिक राबवण्यात आलेले आहे. त्यात सुमारे ३६२२ शेतकऱ्यांचा समावेश होता. यामध्ये सुमारे ३५ टक्के वाढ झालेली आहे. दर्जेदार सोयाबीन उत्पादनासाठी वाशीम जिल्ह्याची ओळख वाढत चालली आहे.

दरवर्षी या ठिकाणच्या सोयाबीनला प्रामुख्याने बियाणे कंपन्यांकडून अधिक मागणी राहते. त्यामुळेच या ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये कंपन्यांकडून सोयाबीनला इतर ठिकाणांपेक्षा सरस दर देण्याची स्पर्धासुद्धा बघायला मिळते. या वर्षी अतिपाऊस झाल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अशा वर्षातही जिल्ह्यात बीबीएफ, बेडवर टोकण, सरी वरंबा, अमरपट्टा, मृतसरी अशा विविध पद्धतींनी झालेल्या लागवडीचे परिणाम चांगले मिळाले आहेत.

अशा पद्धतीने लागवड करणारे व गेल्या हंगामात पारंपरिक पद्धतीने पेरणी केलेल्यांच्या उत्पादनात बराच फरक आढळून आलेला आहे. गेल्या वर्षी पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची उत्पादकता १६.९९ क्‍विंटल एवढी होती. तर या हंगामात प्रकल्पात प्रात्यक्षिक राबवलेल्या ठिकाणी उत्पादकता हेक्टरी २६.१४ क्विंटल अशी मिळालेली आहे.

पारंपरिकच्या तुलनेत ३४.९९ टक्के वाढ असल्याचा दावा या आकडेवारीतून करण्यात आला आहे. अतिपाऊस असतानाही बीबीएफ, बेडवर टोकण, सरी वरंबा, अमरपट्टा, पट्टा पेर, मृतसरी अशा पद्धतींचा फायदा झाल्याचे दिसून आले. जास्त पाऊस असतानाही पिकाचे नुकसान कमी राहिले. एखाद्या वर्षी पावसात खंड पडला तरी या लागवड पद्‍धतीने नुकसान टाळणे शक्य होऊ शकते.

तालुका---प्रकल्प क्षेत्र (हेक्टर)---प्रकल्पाची उत्पादकता---उत्पादकतेत वाढ

वाशीम---५००---२७.४४---२९.७४

रिसोड---५००---२४.१४---२९.५२

मंगरूळपीर---५००---२६.४४---३३.२०

मानोरा---५००---२५.६६---३८.५५

मालेगाव---५००---२८.०२---४०.८४

कारंजा---७००---२५.१६---३७.४४

जिल्हा---३२००---२६.१४---३४.९९

सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी सोयाबीन पीक प्रात्यक्षिक योजना या हंगामात ३२०० हेक्टरवर राबवली. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या पेरणींचे परिणाम चांगले आलेले आहेत. प्रात्यक्षिक क्षेत्रात सोयाबीनची हेक्टरी सुमारे ३५ टक्के उत्पादकता वाढलेली दिसून आलेली आहे. बीबीएफ, बेडवर टोकण, सरी वरंबा, अमरपट्टा, पट्टा पेर, मृतसरी अशा विविध पद्धतींनी पेरणी करणाऱ्यांना हंगामात जास्त किंवा कधी कमी पाऊस झाला तरीही नुकसान टाळणे शक्य आहे, हे स्पष्ट दिसून आले.
शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT