Anil Jadhao
जगात ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे महत्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. यंदा ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज व्यक्त होतोय.
जागतिक सोयाबीन उत्पादनात ३४९ लाख टनांची वाढ होईल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केलाय. मात्र या दोन्ही देशांमध्ये यंदा ला निना स्थितीचा मोठा फटका बसतोय. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकण्याची दाट शक्यता आहे.
युएसडीनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मागील हंगामात अमेरिकेत १ हजार २१५ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. तर यंदा १ हजार १८२ लाख टनांवर उत्पादन स्थिरावण्याची शक्यता आहे.
ब्राझील आणि अर्जेंटीनातील पिकाबाबत लगेच काही सांगता येणार नाही. तसंच चीनची सोयाबीन खरेदी आता वाढली आहे. मात्र नेमकं अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलं. त्यामुळं जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात तेजी आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर तेजीत आसल्याचा फायदा भारतीय सोयाबीनलाही मिळतोय. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळतोय.
सोयाबीनचे दर आणखी काही दिवस सरासरी किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.